तळवडेतील कंपनीतून पाच लाखांचा माल चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळवडेतील कंपनीतून पाच लाखांचा माल चोरीला
तळवडेतील कंपनीतून पाच लाखांचा माल चोरीला

तळवडेतील कंपनीतून पाच लाखांचा माल चोरीला

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : पत्रा उचकटून कंपनीत शिरलेल्या चोरट्याने पाच लाखांचा माल चोरला. ही घटना तळवडेत घडली. चंद्रकांत वामन माने (रा. मोहननगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तळवडेतील ज्योतिबानगर येथील निवा कंपनीतील शटरमागील बाजूचा पत्रा उचकटून व बाथरूमच्या काचा फोडून चोरट्यांनी १६ हायड्रॉलिक सिलेंडर, ६४ एमएस रॅक, १६ शाप्ट व स्लायडिंग गेट असा पाच लाख १८ हजार ९९४ रुपये किमतीचा माल लंपास केला.

भोसरीत तडीपार आरोपीला अटक
दोन वर्षांसाठी तडीपार असूनही हद्दीत आलेल्या आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त केला. दत्ता एकनाथ लोणकर (वय ३६, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी) असे त्याचे नाव आहे. त्याला ३१ मार्च २०२१ पासून दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरीही तो हद्दीत आला होता. पोलिसांनी त्याला शनिवारी (ता. २) रात्री साडेनऊ वाजता ताब्यात घेतले.

देहविक्रयप्रकरणी दोघांना अटक
पिंपळे सौदागर येथे वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी सांगवी पोलिसांनी छापा टाकला. दोन महिलांची सुटका करून स्पा मालकासह मॅनेजरला अटक केली. स्पा मालक अविनाश शांताराम शिंदे (वय २७, रा. कोपर आळी, लोहगाव) व मॅनेजर विनोद चनप्पा जाधव (वय २७, रा. वाघमारे वस्ती, वाकड) यांना अटक केली आहे. पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील अविवा स्पा शॉप येथे दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार छापा टाकून दोन महिलांची सुटका करून चार हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

तीन लाखांचा अपहार; एकावर गुन्हा
तीन लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कृष्णा धनराज हंबीर (वय २७, रा. मंत्रीनगर, लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. प्रशांत मुरलीधर ठाकरे (रा. लक्ष्मीबाई कॉलनी, निंबाळकरनगर, ताथवडे) यांनी फिर्याद दिली आहे. नवीन गाडी बुक करण्यासाठी ते शोरूममध्ये गेले होते. तेथील सेल्स मॅनेजरने चार लाख रुपये आज डाऊन पेमेंट करावे लागतील, लगेच तुम्हाला उद्या गाडी मिळेल असा विश्वास दाखविला. ठाकरे यांना त्यांच्या महाराष्ट्र बँक रावेत शाखेत घेऊन जाऊन शोरूमच्या खात्यावर पैसे भरून न घेता स्वतःच्या एचडीएफसी बँक खात्यावर आरटीजीएस मार्फतीने तीन लाख रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर त्या रकमेचा अपहार केला. हा प्रकार शनिवारी (ता. २) भूमकर चौकातील नेक्सा शोरूम व रावेत येथील महाराष्ट्र बँक येथे घडला.

विवाहितेचा छळ; सासरच्यांवर गुन्हा
हुंडा दिला नाही, तसेच इतर कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल आहे. पती विशाल बायस्कर, सासरे केशव बायस्कर, दीर निखिल बायस्कर, सासू व नणंद (सर्व रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर, चिखली) अशी त्यांची नावे आहेत. विवाहितेच्या फिर्यादीनुसार, मुलाच्या क्लासच्या फी वरून विशालने फिर्यादी पत्नीशी भांडण केले. फिर्यादी व मुलाला घराबाहेर काढले. फिर्यादीच्या वडिलांनी लग्नात हौस केली नाही, हुंडा कमी दिला, लग्नात चाळीस हजार रुपये दिले नाहीत, असे म्हणत सासू, सासरा, दीर सतत फिर्यादीला टोचून बोलत मानसिक व शारीरिक त्रास देत. फिर्यादीने घटस्फोट देण्यासाठी नकार दिला असता आरोपींनी त्यांना मारहाण केली. आरोपी पतीने फिर्यादी काम करीत असलेल्या कंपनीत जाऊन जबरदस्तीने रूमची चावी घेतली. फिर्यादी कामावरून सुटल्यानंतर घरी आल्या असता पतीने त्यांना घरात घेतले नाही. त्यांना घराच्या बाहेर ओढून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59674 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top