सिलेंडरमधून गॅस गळती; भडका उडाल्याने दोन जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिलेंडरमधून गॅस गळती; भडका उडाल्याने दोन जखमी
सिलेंडरमधून गॅस गळती; भडका उडाल्याने दोन जखमी

सिलेंडरमधून गॅस गळती; भडका उडाल्याने दोन जखमी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : स्नॅक सेंटरमधील सिलेंडरमधून गॅस गळती होऊन भडका उडाल्याने दोन जण जखमी झाले. ही घटना चिंचवड येथे मंगळवारी (ता. ३) सकाळी घडली. स्नॅक सेंटर मालक मनोज तेवार व कामगार प्रदीप कुपार अशी जखमींची नावे आहेत. चिंचवडमधील जुन्या जकात नाक्याच्या परिसरात विविध दुकाने आहेत. येथील एका स्नॅक सेंटरमध्ये मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास ग्राहकांची गर्दी होती. त्याचवेळी सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने भडका उडाला. येथे सहा सिलेंडर होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस व अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. दुकानातील सिलेंडरसह इतर वस्तू बाहेर काढून अर्ध्यातासात आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59719 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top