मोशीत वृद्धाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोशीत वृद्धाचा खून
मोशीत वृद्धाचा खून

मोशीत वृद्धाचा खून

sakal_logo
By

ज्येष्ठ नगारिकाचा
मोशीत खून


पिंपरी, ता.४ : वृद्ध मजुराचा कठीण वस्तू व हत्याराने मारहाण करून खून केल्याची घटना मोशीतील टोलनाक्याजवळ घडली. सुरेश प्रभाकर काळे (वय ६०, रा. मोशी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा आशिष सुरेश काळे (वय २६, रा. स्वप्ननगरी, चाकण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. मृत सुरेश यांचे कुटुंब चाकण येथे वास्तव्यास असून, ते मोशी परिसरात मजुरीचे काम करीत होते. सोमवारी (ता. २) दुपारी सव्वाएकच्या सुमारास मोशी टोलनाक्याजवळील इला सोसायटीच्या मागील मोकळ्या जागेत त्यांना कोणीतरी कठीण वस्तू व हत्याराने मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59793 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top