काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई
काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई

काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला. एका दिवसात ८२३ वाहनांवर कारवाई करीत आठ लाख ७९ हजारांचा दंड वसूल केला. दाट काळ्या रंगाच्या काचा बसवून अथवा काचांवर फिल्म चिकटवून हा उद्योग केला जातो. अशा वाहन चालकांविरोधात सोमवारी (ता. २) विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलिस पथकासह आयुक्तालयाच्या हद्दीतील चौकाचौकांत अशा वाहनांना थांबवून फिल्म काढून टाकत दंडात्मक कारवाई केली.

वाहतूक विभागनिहाय झालेली कारवाई व दंड पुढीलप्रमाणे : सांगवी-१५५ (एक लाख ५४ हजार ५००), हिंजवडी - ३८ (३८ हजार ), निगडी - ३४ (३५ हजार), चिंचवड - ४५ (३६ हजार ५००), पिंपरी - ३६ (३७ हजार ), भोसरी - ९६ (एक लाख ८ हजार), चाकण - ११५ (एक लाख ३० हजार ५००), देहूरोड - १८ (२० हजार), दिघी-आळंदी- ५३ (६० हजार ५००), तळवडे - ६८ (६९ हजार), वाकड - ५३ (७६ हजार ७००), तळेगाव- ३६ (३८ हजार), म्हाळुंगे -७६ (७६ हजार).

------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59818 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top