
वल्लभनगर आगार गर्दीने भरले
पिंपरी, ता. ४ ः उन्हाळी सुट्या, लग्नसराई यामुळे एसटी बसस्थानकांवर सकाळपासून प्रवाशांची गर्दी होत आहे. मे महिन्यात तब्बल अकरा विवाह मुहूर्त आहेत. तसेच यात्रांचा हंगाम असल्यामुळे प्रवासी भारमानात पाच टक्के वाढ झाली आहे. मुंबई, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, अकोलासह ज्या ठिकाणी तीन तासापांपेक्षा जास्त वेळ प्रवासासाठी लागतो तेथे जाण्यासाठी सकाळी वाजतापासूनच प्रवासी स्थानकावर गर्दी करीत आहेत. दुपारी १२ पर्यंत ही गर्दी कायम असते. त्यानंतर दुपारी एकपर्यंत प्रवासी संख्या काहीशी कमी होते. मात्र सायंकाळी चारच्या दरम्यान गर्दीत पुन्हा वाढ झालेली दिसत आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच प्रवाशांच्या तुफान गर्दीला झालेली सुरूवात मे महिन्याच्या पहिल्या चार दिवसांतही कायम आहे. तीर्थस्थळ, मूळ गाव, नातेवाईक, पर्यटनाकडे लोकांचा अधिक ओढा आहे. नागपूर, अकोला, शेगांव, तसेच नाशिक, जळगाव अशा अधिक पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बसमध्ये जागा मिळेनाशी झाली आहे. बस आली की जागा मिळवण्यासाठी बॅगा घेऊन लोकांची धावाधाव सुरू असते. हाती असलेली बॅग, पिशव्या, सामानाचे गाठोडे, रुमाल, पाण्याची बाटली यापैकी काहीही खिडकीतून आत आसनावर टाकून ती आपली जागा बुक करत असल्याचे चित्र आहे.
--
मागणीनुसार एसटी
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आणि त्यांच्या मागणीनुसार बस सोडल्या जात आहेत. बसच्या फेऱ्या मात्र फारशा वाढल्या नाहीत. कोल्हापूर, नाशिक, सोलापुरला जाण्यासाठी जादा बस सोडण्यात आल्या नसल्या तरी प्रवाशांना आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वल्लभनगर आगाराचे दैनंदिन उत्पन्न साडेसहा लाख रूपये झाले आहे, अशी माहिती स्थानकप्रमुख गोविंद जाधव यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60008 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..