दाट लोकवस्तीत जिजाऊ क्लिनिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाट लोकवस्तीत जिजाऊ क्लिनिक
दाट लोकवस्तीत जिजाऊ क्लिनिक

दाट लोकवस्तीत जिजाऊ क्लिनिक

sakal_logo
By

दाट लोकवस्तीच्या ठिकाणी जिजाऊ क्लिनिक

प्रशासक राजेश पाटील यांची माहिती; १९.६८ कोटी खर्चास मंजुरी

पिंपरी, ता. ४ ः शहरात विविध ठिकाणी आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी लवकरच जिजाऊ क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत, यासह विविध विषयांस महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी बुधवारी मंजुरी दिली. तसेच, विविध कामांसाठी सुमारे १९ कोटी ६८ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली.
स्थायी समिती, विधी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक पाटील यांच्या निर्णयासाठी बैठकीत ठेवले होते. त्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात बैठक झाली. सर्व विभागाचे अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते. महापालिकेतर्फे सध्या वायसीएम, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, नवीन जिजामाता, नवीन थेरगाव, नवीन भोसरी ही रुग्णालये अद्ययावत व सुसज्ज आहेत. तालेरा, यमुनानगर व सांगवी रुग्णालयासह २७ दवाखाने विविध भागात कार्यरत आहेत. ज्या ठिकाणी एक किलोमीटर अंतरात महापालिकेचे रुग्णालय अथवा दवाखाने उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी जिजाऊ क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत. त्यात रुग्णांची तपासणी व आवश्यक औषधे उपलब्ध करून दिले जातील. यामुळे महापालिका रुग्णालये अथवा दवाखान्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल. या क्लिनिकमार्फत रुग्णसेवेबरोबर शासनामार्फत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आरोग्य विषयक सेवा सहज पुरविणे शक्य होणार आहे. आठ हजार ते १० हजार वस्ती असलेला भाग, झोपडपट्टी भाग, जास्त मनुष्यवस्ती असलेल्या चाळी अथवा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी जिजाऊ क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे.

अन्य महत्त्वाचे निर्णय
- अग्निशमन विभागाकडील क्विक रिसपॉन्स (देवदूत) वाहनांची देखभाल दुरुस्ती व चलन वलन करण्याच्या खर्चास मान्यता
- नामनिर्देशनाने ७५ टक्के व पदोन्नतीने २५ टक्के अशा प्रमाणात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदभरती करणार
- पशुवैद्यकीय विभागासाठी तरतूद, पिंपळे गुरवमधील जलनि:सारण नलिका व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करणे
- इ प्रभागात क्रीडा विषयक स्थापत्याची कामे, प्रभाग आठमध्ये नवीन विद्युत खांब, हायमास्ट व विद्युत विषयक कामे करणे
- ज्येष्ठ नागरिक संघासाठी टीव्ही संच खरेदी आणि पीएमपीला संचलन तूट रक्कमेपोटी १६ कोटी देणे
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60075 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top