
पिंपरी : ‘स्मार्ट सिटी’चे काम पूर्णत्वाकडे
पिंपरी - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत (Smart City Scheme) पॅन सिटी (Pan City) आणि एबीडी प्रकल्पांचे (ABD Project) काम ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. या कामगिरीमुळे शहराने देशात अकरा क्रमांक प्राप्त केला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिली. सर्व प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करून शहरातील नागरिकांसाठी खुली करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी शहर सल्लागार समितीची बैठक झाली. त्यात पाटील बोलत होते. आमदार अण्णा बनसोडे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) अशोक भालकर, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, निमंत्रित सदस्य गोविंद पानसरे, कार्यकारी अभियंता मनोज सेठीय, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, विद्यार्थी प्रतिनिधी दीपक पवार, सिटीझन फोरमचे तुषार शिंदे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीला मिळालेले केंद्र व राज्यस्तरीय ‘प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना’, ‘ओपन डेटा वीक, ‘प्लेस मेकिंग’ पुरस्कार; ७५ तासांत तयार केलेल्या सुदर्शन चौकातील ‘८ टू ८० पार्क’ला प्लेस मेकिंग मॅरेथॉन विजेता पुरस्कार; ऊर्जा व हरित इमारती, शहरी नियोजन, हरित आवरण आणि जैवविविधता, गतिशीलता व हवेची गुणवत्ता, जल व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापन या पाच श्रेणींत ‘क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क २.०’ मध्ये पाचपैकी चार स्टार मिळाले; पर्यावरण संतुलनासाटी ‘क्लायमेट चेंज’ पुरस्कार मिळाल्याबद्दल आयुक्तांसह सर्व टीमचे अभिनंदन केले. पॅन सिटी व एबीडी प्रकल्पांतर्गत कामांच्या प्रगतीचे सल्लागारांमार्फत सादरीकरण केले.
स्मार्ट सिटीची प्रगती...
स्मार्ट सारथी ॲपच्या माध्यमातून १ लाख ८५ हजार नागरिकांपर्यंत पोहोचले
विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे कॅम्पेनिंग, मर्चंड मोड्युल ॲपद्वारे व्यापाऱ्यांना व्यासपीठ
म्युनिसिपल ई-क्लासचे २३ पैकी २१ कॉम्पोनंट पूर्ण, डोर टू डोर सर्व्हे सुरू
स्मार्ट बस स्टॉप, पार्किंग, सिनिअर सिटीझन प्लाझा, योगा पार्कची कामे प्रगतीवर
ऑप्टिकल फायबर केबल ५८५ पैकी ५३७ किलोमीटर टाकली असून ९० टक्के काम पूर्ण
२७० ठिकाणी वायफाय, पोल उभारण्याचे काम ९० टक्के, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले
स्मार्ट ट्रॅफिकचे १२२ कॅमेरे बसविले, स्मार्ट पर्यावरण, वॉटर मीटर, सेव्हरेज, वेस्ट मॅनेजमेंट
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60165 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..