मोशी कचरा डेपो प्रकरणाची चौकशी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोशी कचरा डेपो प्रकरणाची चौकशी सुरू
मोशी कचरा डेपो प्रकरणाची चौकशी सुरू

मोशी कचरा डेपो प्रकरणाची चौकशी सुरू

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : मोशी येथील कचरा डेपोला सहा एप्रिल रोजी लागलेल्या आगीच्या चौकशीला सोमवारी सुरुवात झाली आहे. चौकशी दरम्यान अजित गव्हाणे यांनी तब्बल १४ मुद्दे उपस्थित केले आहेत.
भाजप नेते आणि ठेकेदारांच्या संगनमताने झालेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी मोशीतील कचरा डेपोला आग लावण्यात आल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर गव्हाणे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर सोमवारपासून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या आगीबाबत गव्हाणे यांनी संशय व्यक्त करीत आग लागली की लावली? याची चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर पुन्हा १६ एप्रिल रोजी आगीची दुसरी घटना याच ठिकाणी घडल्यानंतर महापालिका आयुक्तांनी आगीच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि शहर अभियंता राजन पाटील यांच्या समितीच्या माध्यमातून कचरा डेपोतील आगीची सखोल चौकशी करण्यात येत आहे. प्रामुख्याने कचरा डेपोमध्ये असलेल्या मेकॅनिकल कम्पोस्टिंग, सॅनिटरी लॅन्डफिल, प्लास्टिक टू फ्युएल प्लान्ट, वर्मी कम्पोस्टिंग प्लान्ट, प्लास्टिक वेस्ट टू ग्रॅन्युएल्स, वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पातील ठेकेदारांना वाचविण्यासाठी व त्यांचा भ्रष्टाचार उघड पडू नये म्हणून ही आग लावण्यात आली आहे, असे गव्हाणे यांचे म्हणणे आहे.
सोमवारी झालेल्या चौकशी दरम्यान अजित गव्हाणे यांच्यासह माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, धनंजय आल्हाट यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.

‘‘चौकशी योग्य पद्धतीने झाल्यास आगीमागील कारणे आणि भाजपचा भ्रष्टाचार जनतेसमोर नक्कीचा उजेडात येईल.’’
अजित गव्हाणे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60189 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top