पिंपरी-चिंचवडमध्ये शांतता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये शांतता
पिंपरी-चिंचवडमध्ये शांतता

पिंपरी-चिंचवडमध्ये शांतता

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः मशिदींवरील भोंगे हा राज्यभर तणावाचा विषय ठरला असला तरी पिंपरी-चिंचवड शहरात शांतता राहिली. मुस्लिम बांधवांनी ध्वनीक्षेपकाविना नमाज पठण केले. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी सकाळीच ‘मनसे’च्या प्रमुख ३० पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेवुन सायंकाळी सोडून दिले. दरम्यान, मंदिरे, मशिदींसह मनसेच्या पिंपरीतील मुख्य कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही संपूर्ण शहरात फेरफटका मारून वातावरणाचा आढावा घेतला. नमाज पठणावेळी ध्वनीक्षेपक लावला जाणार की नाही, याविषयी नागरिकांना उत्सुकता होती. तसेच मनसे व हिंदुत्ववादी संघटना यांची काय भूमिका काय असेल याविषयीही विविध तर्क होते. मात्र, दोन्ही बाजूंनी संयम बाळगत कायदा व सुव्यवस्थेचे पालन केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60207 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top