सणांतून संस्कृती आणि संस्कृतीतून आरोग्यप्राप्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणांतून संस्कृती आणि संस्कृतीतून आरोग्यप्राप्ती
सणांतून संस्कृती आणि संस्कृतीतून आरोग्यप्राप्ती

सणांतून संस्कृती आणि संस्कृतीतून आरोग्यप्राप्ती

sakal_logo
By

सणांतून संस्कृती अन्
संस्कृतीतून आरोग्यप्राप्ती शक्य

निगडीत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रत्नप्रभा चौधरी

पिंपरी, ता. ५ ः ‘‘संस्कृतीचे आदानप्रदान आणि आनंद निर्मितीसाठी भारतीय सण साजरे केले जातात. या सणांतून संस्कृती आणि संस्कृतीतून आरोग्यप्राप्ती होते,’’ असे प्रतिपादन आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रत्नप्रभा चौधरी यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे निगडी-प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत ‘हिंदू सण, संस्कृती व आयुर्वेद’ या विषयावर चतुर्थ पुष्प गुंफताना डॉ. चौधरी बोलत होत्या. उद्योजिका मीनू नायर, मंडळाचे सचिव प्रदीप पाटील, व्याख्यानमाला सहप्रमुख विकास देशपांडे उपस्थित होते. डॉ. चौधरी म्हणाल्या, ‘‘शरीर, मन आणि आत्मा यांच्या उन्नतीसाठी सणांचे महत्त्व आहे; कारण सणांच्या माध्यमातून मानवाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास होतो. सणांमुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. स्वतःची ओळख अन् परमात्म्याशी जोडण्याचे काम सण करीत असतात. आयुर्वेदात ऋषींना ‘आप्त’ म्हणतात; तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना ‘आप्तप्रमाण’ म्हटले जाते. ‘वैविध्यातून एकतेकडे’ हे भारतीय हिंदू संस्कृतीचे ब्रीद आहे. त्यामुळे एकच सण वेगवेगळ्या नावांनी अन् पद्धतींनी देशभरात साजरा केला जातो. हिंदू संस्कृती ही धर्म, ऋतू, निसर्ग यांच्याशी निगडित आहे. त्यामुळे संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला आयुर्वेद ऋतुचर्या, दिनचर्या यांचे पालन करावे, असे सांगतो.’’ धनंजय शेडबाळे यांनी प्रास्ताविक केले. विनीत दाते आणि दीपक नलावडे यांनी परिचय करून दिला. श्रीकांत मापारी यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता बाऊसकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60273 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top