पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर दंडात्मक कारवाईत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police
पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर दंडात्मक कारवाईत वाढ

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर दंडात्मक कारवाईत वाढ

सोमाटणे - वाहतूक नियमाच्या (Transport Rules) उल्लंघनामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) अपघात (Accident) वाढले असून, यावर उपाय म्हणून नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईवर (Crime) अधिक भर दिला जात आहे. काही ठिकाणी स्वयंचलित स्पिडगन व सीसीटव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने या यंत्रणेचा कारवाईसाठी फायदा होत आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्रुतगती मार्गावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, सन २०२१ मध्ये वर्षभरात ४२ अपघात झाले. यात ४० जणांचा मृत्यू झाला, तर ८७ जण जखमी झाले. सन २०२२ मध्ये चार महिन्यांत १३ अपघात झाले, यात १६ जणांचा मृत्यू झाला, तर ५३ जखमी झाले. अपघाताचे वाढते प्रमाण विचारात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार महामार्ग पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाईवर अधिक भर देण्यात आला आहे.

स्वयंचलित स्पिडगन व सीसीटव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने सन २०२२ च्या चार महिन्यांत किवळे ते खंडाळा दरम्यान वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ५५ हजार ४०९ वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली असून, या वाहनांवर १० कोटी २९ लाख ७२ हजार ३०० रुपये दंड टाकण्यात आला आहे.

यापूर्वी वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकाडून दंड वसूल करताना वाहनचालक दादा, नाना, अण्णा, आमदार, खासदार, मंत्री आदींची नावे पोलिसांना सांगून पसार होत होते, परंतु आता स्वयंचलित यंत्रणेमुळे मंत्र्यांचीही दंडातून सुटका होत नाही.

दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, हलक्या वाहनांसाठी ताशी शंभर किलोमीटर व जड वाहनांसाठी ताशी ऐंशी किलोमीटर या दिलेल्या वेग मर्यादेचे पालन करावे, लेन कटिंग करू नये, सूचना फलकांवरील नियमांचे पालन करावे, असे आवाहन वडगाव, लोणावळा, खंडाळा, बोरघाट महामार्ग पोलिसांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60295 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top