प्रतिक्षा प्रेक्षक व नाटकांची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिक्षा प्रेक्षक व नाटकांची
प्रतिक्षा प्रेक्षक व नाटकांची

प्रतिक्षा प्रेक्षक व नाटकांची

sakal_logo
By

एंट्रो ः
पुण्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक भागविण्यासाठी महापालिकेने विविध भागात चार नाट्यगृहे उभारली आहेत. मात्र, उद्देश सफल झाला का? नियमीत देखभाल व दुरुस्ती होते का? काय आहेत अडचणी? प्रेक्षकांच्या काय आहेत मागण्या?...याविषयीचा घेतलेला आढावा. सद्यःस्थितीत तरी पांढरा हत्ती अशी स्थिती आहे.
-------
रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता. ५ ः पिंपळे गुरव परिसरात नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आहे. मात्र, नाटकांऐवजी इतर सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमच अधिक होतात. त्यामुळे उपनगरातील रसिक प्रेक्षकांनी याकडे सध्या पाठ फिरविल्याचे चित्र आहे. याची आसन क्षमता ५५० आहे.

दहा वर्षापूर्वी या परिसरातील नागरिकांना नाटक पाहण्यासाठी पुणे किंवा चिंचवड येथे जावे लागायचे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून डिसेंबर २०१७ मध्ये पिंपळे गुरव येथील मध्यवर्ती भागात हे नाट्यगृह उभारले. मात्र, सुरूवातीचे काही महिने वगळता नाटकांचे प्रयोग फार अपवादाने झाले.
यानंतर कोरोनाचा काळ, लॉकडाऊनचे निर्बंध यामुळे नाट्यगृहासाठी संकटकाळ ठरला. आता निर्बंध हटूनही नाट्यप्रयोगात सातत्य नाही. महिन्यातून एखाद्या नाटकाचा प्रयोग येथे होतो. एप्रिल महिन्यात येथे ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचा एकमेव प्रयोग झाला. आठ मे रोजी एका नाटकाचा प्रयोग होणार आहे. नाटकाच्या तीन तासांच्या एका प्रयोगासाठी साडेपाच हजार भाडे द्यावे लागते. तर तिकीट दर तीनशे, चारशे व पाचशे रुपये आहे. अशी माहिती नाट्यगृह व्यवस्थापनाने दिली. महापालिकेच्या इतर नाट्यगृहाच्या तुलनेत आसन क्षमता कमी आहे. दर्जेदार नाटकांचे विविध प्रयोग होण्यासाठी महापालिका सांस्कृतिक विभागाकडून प्रयत्न करायला हवा, असा रसिकांचा सूर आहे.

नाट्यगृह अवघ्या पाच वर्षांपूर्वी बांधलेले असल्याने कोणतीही दुरवस्था नाही. रंगरंगोटी, रंगमंच, आसन व्यवस्था, ध्वनियंत्रणा, स्वच्छता अतिशय चांगली आहे. मात्र, नाटकांऐवजी इतर कार्यक्रमांनाच येथे अधिक मागणी आहे. त्यामुळे दर्जेदार नाटकं व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद याच्या प्रतिक्षेत नाट्यगृह आहे.
--
कोविड लसीकरण केंद्र
नाट्यगृहात सात कर्मचारी पूर्णवेळ काम करतात. यात एक व्यवस्थापक, एक लिपिक व रंगमंच व इतर देखभालीसाठी पाच जण असा समावेश आहे. स्वच्छता, सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने काम दिले आहे. नाट्यगृहाच्या वरच्या भागात सांस्कृतिक सभागृह व बैठक हॉल आहे.सध्या एका भागात कोविड लसीकरण केंद्र सुरू आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60322 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top