अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

सर्वधर्मीयांना
शीरखुर्माचे वाटप
पिंपरी, ता. ५ ः ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहाद्दूल मुस्लिमीन पक्ष पिंपरी चिंचवड शहर, मरहूम अय्युब मुजावर ट्रस्ट, एके बॉईज मित्र परिवार यांच्या वतीने गरीब गरजू सर्वधर्मीय बांधवांना शीरखुर्माचे वाटप करण्यात आले. खराळवाडी येथील जामा मशीद व गांधीनगर येथील मशिदीमध्ये नमाजासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना एमआयएम शहराध्यक्ष धम्मराज साळवे, खालिद मुजावर, उमर मुजावर, संतोष शिंदे यांच्या हस्ते शीरखुर्मा वाटप केले. सोनू कुरेशी, संतोष शिंदे, शोएब शेख, अयान शेख, नवाज शेख, करीन कुरेशी, अयान कुरेशी, आली कुरेशी, जिलानी कुरेशी, मोहतसेन सिद्दीकी, सोनू कुरेशी उपस्थित होते .

बसवेश्वर यांना
अभिवादन
पिंपरी, ता. ५ ः रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मयूर जगताप व शहर संघटक अभिजित लगाडे यांच्या हस्ते संत बसवेश्वर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, शहर उपाध्यक्ष समाधान गायकवाड उपस्थित होते. साळवे म्हणाले, ‘‘बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते.’’

ईदनिमित्त
फळे वाटप
पिंपरी, ता.५ ः डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी वाय एफ आय) पिंपरी-चिंचवड शहर शाखेने दत्तवाडी आकुर्डी येथे सर्वधर्मीय युवकांना सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यासाठी ईद साजरी केली. या वेळी उपस्थित युवकांना फळे आणि गोड भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन अमिन शेख, शिवराज अवलोळ, गौरव पानवलकर, मनोज शिंदे, इर्शाद शेख, प्रसाद जगताप, अनिकेत मोरे, आफ्रिन शेख, नासिर शेख, गुलनाज शेख, आदर्श पांडे, श्रीकांत सुतार, नीतेश चावरिया यांनी केले.


पिंपरी, ता.५ ः निगडी-यमुनानगर येथील शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अनाथ मुलांना मोफत पोशाखाचे वाटप केले. ट्रस्टच्या वतीने खास महिलांसाठी आणि अनाथ मुलांसोबत रमजान साजरा केला. सुमन पवळे, बापू घोलप, मौलाना गुलाम अशरफ अशरती, महम्मद मुशर्रफ रजा,शेखबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आलम बाबा शेख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अस्मा शेख, शाहीन शेख,समीर शेख, अनिकेत वाघमारे सोहेल शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60375 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top