
औद्योगिक क्रीडा स्पर्धेत टाटा मोटर्सला विजेतेपद
औद्योगिक क्रीडा स्पर्धेत
टाटा मोटर्सला विजेतेपद
पिंपरी, ता. ५ : औद्योगिक क्रीडा संघटनेतर्फे आयोजित औद्योगिक क्रीडा स्पर्धामध्ये टाटा मोटर्स (४५ गुण) संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर बजाज ऑटो संघाला (३२ गुण) मिळवून उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. टाटा मोटर्स संघाने वेटलिफ्टिंग, क्रिकेट, हॉलीबॉल, फुटबॉल व सिंहगड चढणे यामध्ये विजेतेपद मिळवले. तर बजाज ऑटो संघाने योगा, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स व बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थान मिळवून उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
पूना गोल्फ क्लब, शास्त्रीनगर येथे संघटनेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३० एप्रिल २०२२ रोजी झाली. त्या सभेत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. सचिव वसंत ठोंबरे, उपाध्यक्ष नरेंद्र कदम, खजिनदार सदाशिव गोडसे यावेळी उपस्थित होते. टाटा मोटर्सचे ज्येष्ठ क्रिकेटपटू विजय हिंगे, राजू वाघ यांनी विजेतेपदाचा स्वीकार केला. बजाज ऑटो संघाकडून वेल्फेअर ऑफिसर सुयोग फुलबडवे यांनी उपविजेते पदाचा चषक स्वीकारला. प्रास्ताविक सदाशिव गोडसे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत ठोंबरे यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60376 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..