
‘रेल्वेलगतच्या झोपडपट्ट्यांचे एसआरएमार्फत पुनर्वसन करा’
पिंपरी, ता. ५ : महापालिकेच्या हद्दीतील रेल्वे लगतच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रक्रिया राबविताना प्रत्येक मुद्दावर सर्वकष विचारविनिमय करून तीनशे चौरस फुटापेक्षा मोठे घर मिळावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. झोपडपट्ट्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोटीस बजावून कार्यवाही सुरू आहे. घर हक्क संघर्ष समितीच्या मागणीनुसार या कारवाईबाबत १३ एप्रिल २०२२ रोजी रेल्वे प्रशासनाला सकारात्मक पत्र दिले आहे. त्यावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या पत्रात पुनर्वसनाचा निश्चित कालावधीचा उल्लेख नाही. या पुनर्वसनाबाबत दानवे यांनी रेल्वेची एक इंचही जमीन न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आनंदनगर, साईबाबानगर, दळवीनगर, निराधारनगर, कासारवाडी, दापोडी आदी झोपडपट्ट्यांबाबत एसआरएमार्फत पुनर्वसनाचा प्रयत्न तातडीने करावा लागणार आहे. झोपडपट्टीवासीयांना घर देताना नेमके किती चौरस फूट घर विकसक देणार आहे? याचे स्पष्टीकरण जनसुनवाई घेऊन लोकांना दिले गेले पाहिजे. ही प्रक्रिया राबवीत असताना वेळ न घालवता पारदर्शक, लोकाभिमुख पद्धतीने राबवली गेली पाहिजे, अशी मागणी भापकर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60397 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..