निगडीमध्ये पोलिसाला धक्काबुक्की व दमदाटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगडीमध्ये पोलिसाला 
धक्काबुक्की व दमदाटी
निगडीमध्ये पोलिसाला धक्काबुक्की व दमदाटी

निगडीमध्ये पोलिसाला धक्काबुक्की व दमदाटी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : मोबाईल हिसकावल्याबाबत पोलिस विचारपूस करीत असल्याचा राग मनात धरून पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करीत धक्काबुक्की करण्यात आली. हा प्रकार निगडी येथे घडला. नरेश ऊर्फ प्रांजल सुनील घटवट (वय २७, रा. ओटास्कीम, निगडी) याला निगडी पोलिसांनी अटक केली असून, एका पन्नास वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल आहे. अमर काळूराम जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ते निगडी पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत आहेत. आरोपी नरेश व त्याच्या आईने फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करीत धक्काबुक्की केली. त्यांची कॉलर पकडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

निगडीत सहा किलो गांजा जप्त
गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने निगडी येथे अटक केली. त्यांच्याकडून सहा किलो गांजा जप्त केला. अशोक दशरथ पवार (वय २३, रा. खुळेवाडी, चंदननगर, पुणे, मूळ-उस्मानाबाद ), श्यामराव राजेश पवार (वय २९, रा. काळभोर गोठा, ओटास्कीम, निगडी) यांना अटक केली असून भीमा वाघमारे (रा. पाली, कोलवड, जी. बीड) याच्यावर गुन्हा दाखल आहे. बुधवारी (ता. ४) मध्यरात्री निगडी, यमुनानगर येथील भक्ती-शक्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

वाकडमध्ये ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात देहूरोड - कात्रज महामार्गावर वाकड येथे घडला. शंकर बिहारीलाल पाटील (वय २४, रा. ताथवडे, ता. मुळशी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ खिलेशकुमार बिहारीलाल पाटील (वय २२, रा. ताथवडे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक पांडुरंग मच्छिंद्र चव्हाण (रा. तळये, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला पोलिसांनी अटक केली आहे.


क्रीप्टोकरन्सी कमी दराने देण्याच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक
क्रीप्टोकरन्सी पाच रुपये कमी दराने देण्याचे आमिष दाखवून तिघांनी मिळून एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. शुभम हवा ऊर्फ विश्वनाथ राजकुमार हवा (वय २२, रा. तळेगाव, ता. शिरूर अनंतपाळ , जि. लातूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. दोन साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. पुष्पराज रामविलास गुप्ता (रा. लोणी काळभोर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभमने फिर्यादीचा मित्र विजय वाघमारे याच्याशी असलेल्या जुन्या ओळखीचा गैरफायदा घेऊन पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केली.

भाच्याचे अपहरण करून खोलीत ठेवले डांबून
मामी व मामाच्या तीन मुलांनी मिळून भाच्याचे अपहरण करून खोलीत डांबले. मारहाण करून मामीने जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पिंपरी व पुण्यातील शिवमांजरी येथे घडला. इस्माईल इब्राहिम शेख (वय ३०) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर खालिद इब्राहिम शेख, जैनोद्दीन इब्राहिम शेख, रोशनबी इब्राहिम शेख (सर्व रा. शिवमांजरी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अजीमलंग नबिसाब शेख-मुल्ला (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी फिर्यादी मुल्ला यांच्या घरी येऊन तू आमच्या घरात चोरी केली आहे, असे म्हणून लोखंडी रॉडने मारहाण केली.


रिक्षाला धडक लागल्याने दोघांना मारहाण
मोटारीची रिक्षाला धडक लागल्याच्या कारणावरून रिक्षातील चौघांनी मिळून मोटारीतील दोघांना मारहाण करून लुटले. ही घटना निगडी येथे घडली. ऋतिक अनिल जाधव (वय २२, रा. दत्तवाडी, आकुर्डी) याला पोलिसांनी टक केली आहे. रोहित गायकवाड, प्रतीक यादव व एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. रशीद मेहबूब खान (रा. हिंजवडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी त्यांच्या मित्रासह पिंपरी येथून तळेगावकडे मोटारीतून जात होते. त्यांच्या मोटारीची धडक रिक्षाला लागली.
त्यावरून रिक्षातील चौघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला मारहाण केली. त्यांच्याकडील ३८ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जबरदस्तीने काढून नेले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60412 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top