प्रेमलोक पार्कमध्ये निसर्गोपचार शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमलोक पार्कमध्ये निसर्गोपचार शिबिर
प्रेमलोक पार्कमध्ये निसर्गोपचार शिबिर

प्रेमलोक पार्कमध्ये निसर्गोपचार शिबिर

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : धकाधकीच्या जीवनात माणसाला अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. विविध व्याधींवर विविध प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. त्यात निसर्गोपचार आणि ॲक्युप्रेशर पद्धती काही व्याधींवर उपयुक्त आहे. या अनुषंगाने प्रेमलोक पार्क ज्येष्ठ नागरिक संघ आणि माधव बाळकृष्ण धनवे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गोपचार आणि ॲक्युप्रेशर पद्धतीचे शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ११० जणांनी या शिबिराचा फायदा घेतला. या वेळी माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, शेखर चिंचवडे तसेच प्रेमलोक पार्क ज्येष्ठ नागरिक संघाचे उत्तम चवरे, यशवंत जोगळेकर, हिंदुराव जाधव, यशवंत फणसळकर, बबन वाळुंज, रमेश राठोड, रमेश केळकर, मिता चौगुले आदी उपस्थित होते.
-------------------------
चिंचवड : निसर्गोपचार शिबिरात सहभागी झालेले प्रेमलोक पार्कचे सभासद.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60416 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top