दुपारी साडेबारा ते चार, घराबाहेर पडणे टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

heat
दुपारी साडेबारा ते चार, घराबाहेर पडणे टाळा

दुपारी साडेबारा ते चार, घराबाहेर पडणे टाळा

पिंपरी : यंदा मार्च महिन्यापासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल-मे मध्येही शहरात ३८ ते ४० अंशांच्या आसपास तापमान आहे. मार्चमध्ये उष्माघाताचे दहा संशयित आढळले होते. त्यामुळे वृद्ध, आजारी, लहान मुले यांनी दुपारी साडेबारा ते चार या वेळेत घराबाहेर पडू नये असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या उष्ण वारे वाहत असून आता हे ऊन जीवघेणे ठरत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत असून अनेक शारीरिक व्याधीही डोके वर काढू लागल्या आहेत. कडक उन्ह असल्याने उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते. शिवाय शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढवू शकतो. या दिवसांमध्ये हवामानाचे स्वरूप पाहता लोकांनी उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

उष्माघाताची लक्षणे
जुलाब, उलट्या, मळमळ होणे, चक्कर येणे, शरीरातील पाणी कमी होणे आणि प्रचंड ताप अशी लक्षणे दिसून येतात. मात्र, उष्माघात झालेल्या रुग्णाच्या शरीरातील पाणी अति प्रमाणात कमी होते. याशिवाय अवयव निकामी होतात. रक्ताची तपासणी केल्यानंतरच उष्माघात झाल्याची खात्री होते.

तेव्हाच असतो धोका
पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ऊन जास्त असले तरी तापमानात चढउतार नाही. त्यामुळे शरीर संतुलित राहते. उन्हाची तीव्रता कमी-जास्त प्रमाण झाल्यास शरीरावर विपरीत परिणाम होतो. तीव्र उन्हासोबत हवेचा वेग वाढतो, तेव्हा ती हवा शरीराला कोरडे करत जाते. यामुळे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम कमी होते. थोडक्यात उष्णतेची लाट येते, असे सोप्या भाषेत म्हटले जाते. अशा वेळी उष्माघात होण्याची शक्यता असते, असे निरीक्षण औषध विभागातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
उन्हाळ्यात थंड पिण्याची तीव्र इच्छा होते. पण, बर्फ कटाक्षाने टाळायला हवा. बाहेरचे खायला नको. आहारमध्ये नैसर्गिक रसदार फळांचा वापर करावा.

रक्त चाचण्यांतून उष्माघात दिसला नाही
यंदा अति तीव्र उन्हाळा आहे. उष्माघाताचे रुग्ण येतील म्हणून आम्ही आधीच तयारीही केली. उलटी, जुलाब, ताप आणि शरीरातील पाणी कमी झालेल्या प्रत्येक रुग्णाच्या अतिशय बारीक नोंदी आम्ही करतो. पण, रक्त चाचण्यांमध्ये उष्माघात असल्याचे दाखवत नाहीत. आतापर्यंत जे चार रुग्ण तपासले त्यांना उलटी, जुलाब आजार अशी लक्षणे दिसून आली.
-डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण रूग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60463 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top