ट्रान्सजेंडरला सुविधा देण्याची रक्षक सामाजिक संघाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रान्सजेंडरला सुविधा देण्याची
रक्षक सामाजिक संघाची मागणी
ट्रान्सजेंडरला सुविधा देण्याची रक्षक सामाजिक संघाची मागणी

ट्रान्सजेंडरला सुविधा देण्याची रक्षक सामाजिक संघाची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती (अधिकार संरक्षण कायदा), २०१९ अंतर्गत, ट्रान्सजेंडरसाठी शिक्षणाचा अधिकार, मतदान, आधार कार्ड यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याशिवाय, त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृह उपलब्ध करण्याची मागणी रक्षक सामाजिक संघाने आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. सार्वजनिक शौचालय ट्रान्सजेंडला वापरण्यास सांगणे हे मूलभूत व नैतिकदृष्ट्या योग्य नाही. स्वतंत्र सार्वजनिक शौचालय वापरण्याची सुविधा नसणे हे घटनेचे उल्लंघन आहे, असे निवेदनामध्ये नोंदविले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक शासकीय कार्यालयात तृतीय समुदायाला स्वतंत्र स्वच्छतागृह लवकरात लवकर निर्माण करून देण्याची मागणी संघाचे अध्यक्ष जमील औटी यांच्यासह सचिव जावेद वालीकर, उपाध्यक्ष प्रवीण परमानंद, वैभव पांडे, रोहित धिवर, नासिर औटी, साहिल कोरगावकर यांनी केली आहे.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60496 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top