बेशिस्त वाहन चालक पोलिसांच्या निशाण्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्त वाहन चालक पोलिसांच्या निशाण्यावर
बेशिस्त वाहन चालक पोलिसांच्या निशाण्यावर

बेशिस्त वाहन चालक पोलिसांच्या निशाण्यावर

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. मोटारीच्या काळ्या काचा, नियमबाह्य सायलेन्सर व ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर बारिक लक्ष असून दहा दिवसात तीन हजार ४३६ जणांवर कारवाई केली आहे.

नियम पायदळी तुडवून सुसाट वाहन चालकांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघाताच्या घटना घडतात. अशा बेशिस्त चालकांना लगाम घालण्यासाठी वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. वाहनांसह कागदपत्रांची कसून तपासणी केली जात आहे. नियमबाह्य सायलेन्सर, काळ्या काचा, फॅन्सी नंबरप्लेट, सिग्नल जंपिंग, ट्रिपल सीट फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. दहा दिवसात आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध विभागांतर्गत काळ्या काचा लावलेल्या एक हजार ७६७ जणांवर, नियमबाह्य सायलेन्सर बसविलेल्या एक हजार १४३ जणांवर तर ट्रिपल सीट फिरणाऱ्या ५३६ वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली.
----------------
यापुढेही कडक कारवाई सुरु राहणार आहे. नियमबाह्य सायलेन्सर बसवून देणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई केली जाणार आहे.
- आनंद भोईटे, उपायुक्त वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड .
-----------------------------------------------------------------------

२५ एप्रिल ते ४ मे या कालावधीतील कारवाई

विभाग काळी काच ट्रिपल सीट सायलेन्सर
भोसरी २२१ ११८ ६४
चाकण ४७० १२६ ४८
चिंचवड ४९ २१ ३२
देहूरोड ६१ २५ १५
दिघी-आळंदी ५८ ९७ ११
हिंजवडी ४३ २६ ४६
म्हाळुंगे १७८ ९३ २७
निगडी ६० ६३ ५९
पिंपरी ९१ ६३ ३१
सांगवी २१९ १३९ १००
तळेगाव ६६ ११० ६
तळवडे १३७ ११३ ३५
वाकड ११४ ९९ ६२
-----------------------------------------------------------------
एकूण १७६७ ११४३ ५३६
-------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60518 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top