
दारूसाठी पैसे न दिल्याने दुकान फोडण्याची धमकी
पिंपरी, ता. ५ : दारू प्यायला पैसे न दिल्याने एकाला त्याचे दुकान फोडण्याची धमकी देत शिवीगाळ केली. ही घटना काळेवाडी येथे घडली.
याप्रकरणी सचिन काकासाहेब पिंपरीकर (वय ४२, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदेश ऊर्फ शिल्व्या चोपडे (रा. अमरदीप कॉलनी, काळेवाडी) याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या परिसरात राहणारा आरोपी संदेश याने सचिनकडे दारू पिण्यासाठी पाचशे रुपये मागितले. ते पैसे देण्यास सचिनने नकार दिला. त्यावरून संदेशने सचिनला शिवीगाळ करून मारहाण केली. संदेश हा साथीदारांच्या मदतीने परिसरात दहशत निर्माण करून व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करतो. यापूर्वी सचिनने हप्ता म्हणून संदेशला रोखीने व एकदा गुगल पेद्वारे पाचशे रुपये दिले होते. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60536 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..