एसएनबीपी महाविद्यालयात विधी उत्सव धुमधडाक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसएनबीपी महाविद्यालयात
विधी उत्सव धुमधडाक्यात
एसएनबीपी महाविद्यालयात विधी उत्सव धुमधडाक्यात

एसएनबीपी महाविद्यालयात विधी उत्सव धुमधडाक्यात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : मोरवाडीतील एसएनबीपी विधी महाविद्यालयात ‘विधी उत्सव-२०२२’ धुमधडाक्यात साजरा झाला.
यानिमित्ताने सिग्नेचर डे, बॉलिवूड डे, प्रोंम डे, फन डे, पार्टी डे, पारंपारिक वेशभूषा दिवस आदी उपक्रम घेण्यात आले. सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


उत्सवाचे उद्घाटन एस. ई. सोसायटीचे संस्थापक सचिव डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, संचालिका ऋतुजा भोसले, प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

विनर मिस मंच- दिव्या काकरे, विनर बॉलिवूड- प्रज्ञा पाटील, विनर म्युझिकल चेअर- स्वाती बरकुल, सुमेध जोगदंडे, एसएनबीपी मिस- अक्षता जैन, स्टुडंट ऑफ द इयर- स्नेहा बोडके, बेस्ट मुटर ॲवॉर्ड- निशिका श्रीनिवास, सिन्सीअर ॲंड रेगुलर स्टुडंट ॲवॉर्ड- भागवत भालेशंकर, बेस्ट ॲक्टीविटी ऑर्गनायझर- अनुष्का ब्रह्मे, प्रसाद लांडे, बेस्ट लायब्ररी युझर- रोशनी जमगाडे यांना मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक शिल्पा जाधव व स्वप्नील जाधव यांनी केले.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60538 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top