
अश्लील व्हिडीओप्रकरणी दोन गुन्हे दाखल
पिंपरी, ता. ५ : अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हिडिओ अपलोड व शेअर केल्याप्रकरणी वाकड व चिंचवड पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लोयटेड चिल्ड्रेन (एनइएमइसी) यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार हे गुन्हे दाखल झाले आहेत.
वाकड पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आरोपींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ अपलोड केले व व्हायरल केले, तसेच चिंचवड ठाण्यात राजकुमार, गिरजेशभाई, विनू परिहार व अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपींनी त्यांच्या अकाऊंटवरून अल्पवयीन मुलांचे व मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. ही बाब ‘एनइएमइसी’ या संस्थेच्या निदर्शनास आल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर मुंबई यांना ही माहिती पाठविण्यात आली. त्यानुसार हे गुन्हे दाखल झाले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------------------------------------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60562 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..