
सांगवडेतील शेतकऱ्यांचा पाणी समस्या मिटला
सोमाटणे, ता. ६ ः सांगवडे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात कासारसाई धरणाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे.
कासारसाई नदीवरील सांगवडे येथील, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्याचा वापर सांगवडे येथील शेतीसाठी केला जातो. गेल्या महिनाभरापासून तापमानात मोठी वाढ झाल्याने शेतीच्या पाण्याची गरज वाढली होती. दरम्यान, शेतीसाठी झालेल्या अधिक पाण्याचा वापर व बाष्पीभवनात झालेली वाढ. या कारणामुळे सांगवडे येथील बंधाऱ्यातील पाणी कमी झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची अडचण होऊ नये, यासाठी नुकतेच कासारसाई धरणातून पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे सांगवडे येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने सध्याची शेतीच्या पाण्याची समस्या सुटली आहे. कासारसाई धरणातही नेहमीपेक्षा यावर्षी अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याने शेतीला पुरेशे पाणी मिळणार आहे.
Smt6Sf1.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60659 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..