
भैरवनाथ महाराजांचा उत्सवानिमित्त विविध उपक्रम
सोमाटणे, ता. ६ ः सांगवडे गावचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराजांचा उत्सव ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सांगवडे येथील भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त ग्रामस्थ व उत्सव कमिटीच्या वतीने विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात आले. यात अखंड हरिणाम सप्ताह, गाथा पारायण, हरिजागर, महापूजा, आरती, पालखी, मिरवणूक, छबिना आदी धार्मिक उपक्रम राबवण्यात आले. गेले पाच दिवस किरण महाराज भागवत, पांडुरंग महाराज शेतोळे, गणेश महाराज शिंदे, आत्मारामजी महाराज शास्त्री, यशवंत महाराज फाले आदींची कीर्तने झाली. सोमाटणे, शिरगाव, गहुंजे परंदवडी, उर्से, साळुंब्रे, गोडुंब्रे, शिवणे, शेलारवाडी, चिंचोली, देहू, थवडे, थेरगाव. पिंपरी, चिंचवड, किन्हई, नेरे, कासारसाई, घोटावडे, डोणे, वाकड, पाचाणे, पुसाणे, चांदखेड आदी गावातील महिला भजनी मंडळांच्या वतीने भजन करण्यात आले. यशवंत महाराज फाले यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60678 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..