विहिरीत पडलेल्या मांजराला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विहिरीत पडलेल्या मांजराला जीवदान
विहिरीत पडलेल्या मांजराला जीवदान

विहिरीत पडलेल्या मांजराला जीवदान

sakal_logo
By

देहू, ता. ६ ः देहूतील माळवाडी गावात एका शेतातील खोल विहिरीत मांजर पडले. त्या मांजराला पुणे येथील स्केल्स अँड टेल्स वाइल्ड लाइफ अॅनिमल रेस्क्यू फाउंडेशनच्या सदस्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.

माळवाडीतील जुन्या खोल विहिरीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून एक मांजर विहिरीत पडले होते. स्थानिक नागरिकांनी अनेक प्रयत्न करूनही मांजर बाहेर काढण्यात त्यांना यश येत नव्हते. गावातील नागरिक मांजरासाठी खाण्याच्या वस्तू विहिरीत टाकायचे. सामाजिक कार्यकर्ते संदीप परंडवाल यांनी पुणे येथील स्केल्स अँड टेल्स वाइल्ड लाइफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशन आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांशी संपर्क साधला. सुरुवातीला या संस्थांतील सहकाऱ्यांनी संयुक्त विद्यमाने खोल आणि अवघड अशा विहिरीत उतरून मांजराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, मांजर भेदरलेले असल्याने विहिरीतील खोल कपारीत लपून बसले. त्यामुळे पहिल्या प्रयत्नांमध्ये यश आले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विशिष्ट प्रकारच्या पिंजऱ्याचा वापर करून मांजराला बाहेर काढले. तसेच त्याच्यावर प्रथमोपचार करून मांजराला सोडण्यात आले. ग्रामस्थांनी रेस्क्यू संस्थेचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60679 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top