मुलांना शाळेतच मिळणार लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांना शाळेतच मिळणार लस
मुलांना शाळेतच मिळणार लस

मुलांना शाळेतच मिळणार लस

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : सहा ते अकरा वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे सुतोवाच केंद्र सरकारने केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली असून, केंद्र सरकारच्या आदेशाची व मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे. मात्र, या वयोगटातील मुले शाळेतच मिळू शकतात. सध्या, शाळांना उन्हाळी सुटी असल्याने त्या सुरू झाल्यावरच अर्थात १३ जूननंतरच मुलांना लस दिली जाईल, असे सध्याचे चित्र आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गाच्या तीन लाटा येऊन गेल्या, असे सांगितले जात आहे. त्यांवर कोणतेही औषध अद्याप मिळालेले नाही. मात्र, कोरोना प्रतिबंधक लस अर्थात प्रतिकार शक्ती वाढविणे हाच एकमेव प्रभावी उपाय आजपर्यंत अधोरेखित झाला आहे. कारण, कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याच्या कालावधीत अर्थात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, सुरुवातीला केवळ फ्रंटलाइन वर्कर व आरोग्य, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठांना व सहव्याधी असलेल्यांना प्राधान्य दिले. टप्प्याटप्प्याने यातील लाभार्थींची संख्या वाढविण्यात आली. सद्यःस्थितीत १२ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. काहींचे तिसरा डोस अर्थात प्रिकॉशन डोसही पूर्ण झाले आहेत. आता सहा ते ११ वयोगटातील मुलांना लस देण्याचे सुतोवाच केंद्र सरकारने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारी केलेली आहे.

नागरिकांचा प्रतिसाद
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आतापर्यंत शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद राहिला आहे. जवळपास ९५ टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी पहिला व ८० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीवरून दिसते. आतापर्यंत ३५ लाख ७६ हजारांवर डोस देण्यात आले आहेत.

असे होतेय लसीकरण
महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व कोर्बेव्हॅक्स लशीचे डोस दिले जात आहेत. या लशीसह स्पुटनिक व्ही लस खाजगी केंद्रांवर दिली जात आहे. आतापर्यंत सर्व लशींचे मिळून महापालिका केंद्रांवर ३० लाख सहा हजार ५१५ डोस आणि खाजगी केंद्रांवर पाच लाख ६९ हजार ८५४ डोस दिले आहेत.

‘‘माझ्या कुटुंबात चार सदस्य आहेत. माझे व माझ्या पतीचे प्रत्येकी दोन डोस घेऊन झाले आहेत. मुलीचा एक डोस झाला आहे. आता मुलीचा दुसरा डोस व पतीला प्रिकॉशन डोस घ्यायचा आहे. त्याबाबतचा एसएमएस आला आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यावर पतीला थोडा त्रास झाला होता. पण, मला व मुलीला काहीही त्रास झाला नाही. मुलगा दहा वर्षांचा आहे. त्यांचे लसीकरण सुरू झाल्यावर प्राधान्याने लस घेऊ.’’
- संध्या डोळे, गृहिणी, भोसरी

‘‘सहा ते ११ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. सूचना आल्यानंतर तातडीने लसीकरण सुरू केले जाईल. त्यासाठी तयारी केली आहे. पण, या वयोगटातील मुले शालेय शिक्षण घेणारेच आहेत. त्यामुळे त्यांची निश्चित संख्या शाळेतच मिळणार असल्याने शाळा सुरू झाल्यानंतरच त्यांना लशीचे डोस देणे सोयीचे ठरेल. महापालिका आयुक्तांशी चर्चा करून याबाबत निश्चित धोरण ठरविले जाईल.’’
- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका

लशीनुसार डोस
लशीचा प्रकार / डोस
कोविशिल्ड / ३०,९१,४९८
कोव्हॅक्सिन / ४,२६,७२४
स्पुटनिक व्ही / ३०,७६२
कोर्बेव्हॅक्स / २७,३८५
एकूण / ३५,७६,३६९
(टीप ः १) पाच मेपर्यंतचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण, २) दुसरा डोस घेऊन नऊ महिने झालेल्यांना प्रिकॉशन डोस दिला जात आहे.)

वयानुसार लशीचे डोस
वय / नियमित डोस / प्रिकॉशन डोस / एकूण
१२ ते १४ / २७,३५९ / ००० / २७,३५९
१५ ते १७ / १,१६,८४६ / ००० / १,१६,८४६
१८ ते ४५ / २२,७०,१७६ / १६२० / २२,७१,७९६
४६ वर्षांवरील / ९,३७,३५४ / ५२,७३५ / ९,९०,०८९
आरोग्य व फ्रंट लाइन वर्कर / १,५३,५८२ / १६,६९७ / १,७०,२७९
एकूण / ३५,०५,०१७ / ७१,०५२ / ३५,७६,३६९

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60680 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top