
पन्हा ऑफर्स, मात्र कामाचे दिवस फिक्स नाहीत
पिंपरी, ता. ७ ः शहरात सुमारे तीन लाख आयटीयन्स आहेत. तर, पाच हजारांहून बड्या आयटी कंपन्या आहेत. कोविड काळात अनेकांच्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या गेल्या. त्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर आता चांगल्या ऑफर्स आणि पगाराच्या नोकऱ्या मिळू लागल्या आहेत. मात्र, कामाचे दिवस सलग नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.
बरेचजण कोविड काळात आपापल्या गावी गेले. ते पुन्हा आलेच नाहीत. तर, अनेकांनी स्वत:साठी कुटुंब व नातेवाईक तसेच मित्रमंडळीमध्ये घर घेतले आहे. परिणामी, त्यांना बॅक टू वर्क जाणे अवघड झाले आहे. काही जण आठवड्यातून दोन ते तीन दिवस एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवास अंतरात प्रचंड वाढ झाली आहे. तसेच, गावी वर्क फ्रॉम होमसाठी स्ट्राँग नेटवर्क मिळत नसल्याने कोवर्किंग प्लेस सर्च करावे लागत आहेत. त्यामुळे, स्वतंत्र घरभाडे, मेस, प्रवास खर्चात वाढ होत आहे.
---
खराडीच्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या भालचंद्र म्हणाल्या, ‘‘मुलं सांभाळण्यासाठी लागणाऱ्या मावशीपासून ते इंधन, किराण्यापर्यंतचे बजेट कोलमडले आहे. दोघेही पती-पत्नी नोकरीला असतील तर, जबाबदारी स्वीकारणार कोण? त्यामुळे वादावादीचे प्रसंग ओढवत आहेत. घरात वडीलधारी मंडळी आजारी पडल्यास आधी केअरटेकर कमी खर्चात मिळत. आता, १५ ते २० हजार रुपये ते मागतात. अशा परिस्थितीत घर भाडेतत्वावर घ्यायचे म्हटल्यास आयटीवाल्यांना तिपटीने भाडे वाढवून मागितले जात आहे. इंटरनेट खर्च ५०० रुपयांवरुन ८०० वर आला आहे. आमचा गलेलठ्ठ पगार असला तरी, त्याला वाटा तितक्याच आहेत. त्यामुळे, वर्क फ्रॉम होमचा आमचा अट्टाहास आहे. अन्यथा, आम्हालाही कंपनीत जाऊन काम करायला आवडेल.’’
हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीतील त्रिशा म्हणाली, ‘‘दोन दिवस वर्क फ्रॉम होम आणि तीन दिवस कामावर. ‘टू प्लस थ्री’ चा फंडा आता कंपन्या वापरत आहेत. तर, काही कंपन्या पूर्णवेळ कामावर तर, पूर्णवेळ घरी काम देत आहेत. अनेकदा डेटा सुरक्षित राहतो की, नाही याची धास्ती कंपन्यांना वाटते. वर्क फ्रॉम होममुळे आमच्यावर देखरेख राहत नाही. मात्र, कंपन्यांचे जागेचे भाडे, वीजबील सर्व खर्चाची बचत होत आहे. कंपन्या केव्हाही डेटाची मागणी करतात. त्यामळे, कंपनीत हजर राहण्यास सांगतात. अशा द्विधा मानसिकतेतून आम्ही जात आहोत. मी सध्या हरियाणातून काम करत आहे. कंपनी आहे पुण्याची. काम मिळाले तसे मी जॉईन केले. आता मला पुण्यात जाणे शक्य नाही. त्यामुळे, कंपनी सोडण्यायाशिवाय पर्याय नाही.’’
--
कोट
दोन वर्ष आयटीयन्स घरात होते. त्यामुळे, कामाची सांगड सद्यपरिस्थितीत घालणे कठीण झाले. घरात पूर्ण वेळ काम केल्याने कलह वाढत आहेत. वर्क फ्रॉम होममुळे चिडचिड वाढली आहे. अनेकांच्या झोपेच्या समस्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सोशल लाइफ कमी झालं आहे. वजनात वाढ झाल्याने शारीरिक व एकूणच मानसिक ताणतणाव वाढला आहे. वेळेवर सर्व कामं होणं त्याच्यासाठी अवघड झाले आहे. पूर्ववत कामावरील शारीरिक श्रम वाढायला हवेत.
- प्रकाश जुकंटवार, पीएसडब्ल्यू, मानसोपचार विभाग, वायसीएम
---
कोट
आयटीयन्सना कामावर परतणे आता अवघड होत आहे. कुटुंब आणि नोकरी अशी दुहेरी कसरत करावी लागत आहे. अनेकांच्या मूळ ठिकाणी नोकऱ्या सुरु आहेत. मात्र, रहिवास दूसरीकडे आहे. वर्क फ्रॉम होममुळे काही प्रमाणात जगण्यातच शिथिलता आली आहे. त्यातच चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या तरीही, पुन्हा या नोकऱ्या टिकवून राहतील की नाही याची चिंता त्यांना भेडसावत आहे. त्यामुळे, ताणतणावातून रिलॅक्सेशन होणं खूप गरजेचं आहे.
- डॉ. रवींद्र कुलकर्णी, फिजिशिअन व हृदयरोग तज्ज्ञ, जस्ट फॉर हार्टस
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60687 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..