विविध कार्यकार्यमांनी राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध कार्यकार्यमांनी राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन
विविध कार्यकार्यमांनी राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

विविध कार्यकार्यमांनी राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीदिनानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांनी शंभर सेंकद स्तब्धता, प्रतिमा पूजन आणि कार्याची ओळख, असे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमास सहायक आयुक्त वामन नेमाने, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक संजीव भांगले आदी उपस्थित होते.

बाबासाहेबांची प्रतिमा भेट
जुनी सांगवी ः जुनी सांगवी येथे प्रशांत शितोळे मित्र परिवारातर्फे अभिवादन करण्यात आले. परिसरातील नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकात्मक फोटोची सही असलेली प्रतिमा नागरिकांना भेट देण्यात आली. प्रशांत शितोळे, पंकज कांबळे, विकास लोले, सुरेश ढमाले, कुंदन गोसावी, शिवाजी पाडुळे, बबन शितोळे, राधिका घोडके आदी उपस्थित होते.

शंभर शब्द स्तब्धता
पिंपळे गुरव ः नवी सांगवीतील कृष्णा चौकात सकाळी दहा वाजता शंभर सेकंदासाठी स्तब्धता पाळून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी ओम साई फाउंडेशनतर्फे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. संजय मराठे, सुनील कोकाटे, संदीप दरेकर, रमेश चौधरी, अप्पासाहेब घोरपडे, राजू आवळेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60696 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top