पाठ्यपुस्तकांचा भासणार तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाठ्यपुस्तकांचा भासणार तुटवडा
पाठ्यपुस्तकांचा भासणार तुटवडा

पाठ्यपुस्तकांचा भासणार तुटवडा

sakal_logo
By

पिंपरी, ता.६ ः समग्र शिक्षा उपक्रमांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळतात. मात्र, या वर्षी शाळांनी ‘युडायस डाटा’ (शिक्षण एकत्रित जिल्हा माहिती प्रणाली) तयार केलेला नाही. परिणामी, शाळांना पाठ्यपुस्‍तकांचा तुटवडा पडणार असल्याचे सूतोवाच शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यावर जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा पर्याय प्रशासनाने सुचविला आहे.
शहरातील सर्व महापालिका, खासगी अनुदानित, शासकीय, आश्रमशाळा अशा ६७१ शाळा कार्यरत आहेत. त्यापैकी महापालिकेकडून ३२९ शाळांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केले जातात. यात पहिली ते आठवीच्या एक लाखावर विद्यार्थी लाभार्थी आहेत. महापालिकेच्या आकुर्डी आणि पिंपरी शहर साधन केंद्रामार्फत हे वाटपाचे कामकाज चालते. दरम्यान, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यात मागील शाळांच्या ‘युडायस डाटा’ नुसार पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीच्या ‘ई-बालभारती’ पोर्टलवर करण्यात येते. त्यानुसार शाळांकडून दरवर्षी माहिती भरली जाते, पण यावर्षी तांत्रिक कारणामुळे शाळांकडून माहिती अद्याप अद्ययावत केलेली नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत २०२१-२०२२ साठीचा ‘युडायस’ डाटा तयार केला नसल्यामुळे नेमकी किती पुस्तकांची मागणी करायची? असा प्रश्‍न शिक्षण विभाग प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तके कमी पडण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

‘शिल्लक आणि जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर’
दरम्यान, २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमधील शिल्लक असलेली व पुनर्वापरासाठी उपलब्ध असलेली पाठ्यपुस्तके व विद्यार्थ्यांकडे सुस्थितीत असलेले पाठ्यपुस्तके इयत्तानिहाय व विषयनिहाय अहवाल आकुर्डी व पिंपरी शहर साधन केंद्राच्या समन्वयकांकडे लवकरात लवकर जमा करण्यात यावे, तसेच ही पुस्तके इयत्तानिहाय व विषयनिहाय शाळास्तरावर संकलित करून ठेवावीत. तसेच येणाऱ्या दरवर्षी प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक कमी पडल्यास ही पाठ्यपुस्तके वाटप करण्यात यावीत, असे आदेश महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी सर्व माध्यमांच्या शाळांना दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60697 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top