मरकळमध्ये शिबिरात २३५ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मरकळमध्ये शिबिरात 
२३५ जणांचे रक्तदान
मरकळमध्ये शिबिरात २३५ जणांचे रक्तदान

मरकळमध्ये शिबिरात २३५ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने मरकळ औद्योगिक नगरीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप देवरे यांच्या हस्ते झाले. या वेळी पदाधिकारी मनीषा कोटक, राकेश मित्तल, गौरव शहा, पशुपतिनाथ चौबे, शैलेंद्र मिश्रा, नवीन करनानी उपस्थित होते.
कामगारांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून दिवस साजरा केला. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देण्यात आले. टोप्या भेटवस्तू देण्यात आल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी समीर शेळके, अतुल कोतवाल, वैभव ढोकले, राजू थारेवे, राजू थोरवे, सागर चौधरी यांनी विशेष परिश्रम केले.
शिबिरामध्ये मास फ्लॅज इंडिया प्रा. लि, मोज्ज इंजिनिअरिंग प्रा. लि. डायनक्सल इंजिनिअर्स प्रा.लि, वॉलमेंट टेक्नॉलॉजी प्रा. लि, वर्षा फोर्जिंग प्रा.लि, क्लीनएज प्रॉडक्ट प्रा.लि, रविन केबल्स प्रा. लि, रविन केबल्स प्रा. लि, रिशी लेजर प्रा. लि, एम.इ.एनर्जी प्रा.लि, हिंदुस्थान प्रेसिंग प्रा.लि, डेक्कन न्यूट्रा प्रा. लि व क्लोराईड मेटल्स लि. या कंपन्यांनी सहभाग घेतला.

‘‘रक्तदानाचे महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा आपल्या जवळच्या माणसांना गरज पडते. म्हणूनच सर्वांनी रक्तदान करून मानवतेला प्रमोट केले आहे.’’
- किशोर कोंढाळकर, सचिव मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशन

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60811 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top