
गुन्हे वृत्त
चिंचवडमध्ये साडे सात लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. ६ : शेअर मार्केट कंपनी असल्याचे भासवून पैसे देण्यास भाग पडले. त्यानंतर साडे सात लाखांची फसवणूक केली.
याप्रकरणी प्रकाश रंगराव पाटील (रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड , मूळ- मु.पो. कूरपळ, ता. वाळवा, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीसह त्यांच्या मित्रांना आरोपींनी त्यांची शेअर मार्केट कंपनी असल्याचे भासवून पैसे देण्यास भाग पडले. त्यानंतर स्टेडी ऑप्शन या ऍपवर फिर्यादी व त्यांच्या मित्रांची सात लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली.
निगडीत एकाला मारहाणप्रकरणी अटक
तरुणाला मारहाण करून मोबाईल लुटल्याची घटना निगडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नरेश ऊर्फ प्रांजल सुनील घनवट (रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तसेच त्याच्या साथीदारावरही गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी शिवाजी बाबूराव वाघमारे (रा. गणेशनगर चौक, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सचिन देवकाते यांना सोडण्यासाठी अंकुश चौक येथे गेले होते. तेथून माघारी येत असताना आरोपी त्यांना जबरदस्तीने खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.
घटस्फोट न घेता केले दुसरे लग्न
पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले. तसेच पत्नीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या ५२ वर्षीय पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पतीने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसरे लग्न करून फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीसह त्यांच्या आईकडून अकोला मध्यवर्ती सहकारी बँक व अकोला अर्बन बँकेतून दोन लाख ३० हजार रुपये कर्ज स्वरूपात काढण्यास भाग पडले. हे पैसे घेतल्यानंतर परत न देता शिवीगाळ करीत फिर्यादीसह त्यांच्या मुलीला चाकूने मारहाण केली.
आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
सोशल मीडियावरील एका पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. विजय नायकिंदे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय श्रीमंत कसबे (रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. फेसबुकवर एक पोस्ट होती. त्यावर आरोपीने आक्षेपार्ह कमेंट केली. यातून भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मामुर्डीत चावा घेऊन मोबाईल पळवला
चावा घेऊन व मारहाण करीत दोघांनी एका तरुणाचा मोबाईल पळवून नेला. ही घटना मामुर्डी येथे घडली. या प्रकरणी अद्वैत प्रकाश माने (वय १८, रा. महाराष्ट्र चौक, भोसरी) याने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरबाज खान, कादिर खान उर्फ मौला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हे फिर्यादी अद्वैतच्या मैत्रिणीच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी हा मामुर्डी येथील एका सोसायटीजवळ थांबला असताना आरोपी तिथे आले. आरोपींनी अद्वैतचा मोबाईल बघण्यासाठी मागितला. त्यावरून शिवीगाळ करून अरबाज याने अद्वैतला दाताने चावा घेऊन त्याचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल पळवला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60839 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..