स्वतः मिळकती नोंदवा; २० टक्के सूट मिळवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वतः मिळकती नोंदवा; २० टक्के सूट मिळवा
स्वतः मिळकती नोंदवा; २० टक्के सूट मिळवा

स्वतः मिळकती नोंदवा; २० टक्के सूट मिळवा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः तुम्ही नवीन किंवा वाढीव बांधकाम केलेय. जुन्या घराचा पुनर्विकास किंवा बांधकामात बदल केलाय. त्याची नोंद स्वतः महापालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागाकडे केल्यास मिळकतकरात पाच टक्के सवलत मिळणार आहे. शिवाय, ३० जूनपूर्वी एकरकमी व ऑनलाइन कर भरल्यास १५ टक्के अशी तब्बल २० टक्के सवलत मिळणार आहे.

कोरोनामुळे नवीन मिळकतींची नोंदणी व करआकारणी महापालिकेकडे झालेली नाही. त्यामुळे स्वत: बांधकामांची नोंद करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘माझी मिळकत माझी आकारणी’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्वतः नोंदणी करणाऱ्यांना मिळकतकरात पाच टक्के सवलत दिली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. या योजनेद्वारे करदात्याला सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वतःच्या मिळकतीची आकारणी स्वतःच करता येणार आहे. कर आकारणी मान्य असल्यास लगेचच मिळकतकर भरता येणार आहे. हा देशातील पहिलाच उपक्रम असेल, असा दावा त्यांनी केला.

अशी करा ऑनलाईन नोंदणी
मिळकतधारकाने महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील ‘नागरिक’ या टॅबवर क्लिक करावे. त्यातील ‘माझी मिळकर माझी आकारणी’ पान उघडावे. ‘न्यू असेसमेंट’ पर्याय निवडावा. त्यातील ‘सेल्फ असेसमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्स’ हा संपूर्ण फार्म भरावा. त्यात मिळकतधारकाचे नाव, आधार, पॅन, मोबाईल, मेल आयडी, सर्वे, फ्लॅट व बिल्डिंग क्रमांक, जागेची ओळख, परिसराचे नाव, पिन कोड आदी माहिती भराव. ‘सेम ॲज अबोव्ह’वर क्लिक करून मिळकत असलेले क्षेत्रीय कार्यालय निवडावे. मिळकतींचा प्रकार नमूद करून पार्किंग एरिया या पर्यायावर ‘होय’ किंवा ‘नाही’ क्लिक करावे. तसेच, मिळकतींचा वापर, बांधकाम प्रकार, क्षेत्र, चौरस फुट, वार्षिक दर, वार्षिक दर करण्यायोग्य मूल्य, दस्तऐवजानुसार संपत्तीचा वापर सुरू करण्याची तारीख आदी माहिती भरावी. आवश्यक तपशील अर्थात कादगपत्र जोडावे. तात्पुरती मालमत्ता कर यावर क्लिक करून ‘नेक्ट बटन’ दाबल्यानंतर अर्ज भरला जाईल.

नोंदणीनंतर पुढे काय?
मिळकतधारकाने स्वतः ऑनलाइन नोंदणी केल्यास त्यांना करसंकलन विभागामार्फत मेलद्वारे विशेष नोटीस येईल. त्यात कराची रक्कम नमूद असेल. ती नोटीस मान्य असल्यास कर आकारणी मान्य होईल. त्यानंतर, ‘पेमेंट’ असा पर्याय येतो. त्यामध्ये अर्ज क्रमांक हाच तात्पुरत्या स्वरुपात मालमत्ता क्रमांक (प्रापर्टी आयडी) असतो. नंतर संबंधित विभागामार्फत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून नवा ‘प्रापर्टी आयडी’ दिला जाईल. मात्र, कर आकारणी अमान्य असल्यास पुढील सुनावणीची प्रक्रिया सुरू होईल.

‘‘नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम व मिळकतीच्या रचनेत केलेला बदल अशा बांधकामांची नोंदणी करणे आवश्यक आहे. मे, जून व जुलैपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर पाच टक्के सवलतीची योजना राबविण्यात येणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. गेल्या वर्षभरात १८ हजार मिळकती नवीन आढळल्या असून त्यांची नोंदणी करून ७० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.’’
- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर आकारणी व करसंकलन विभाग, महापालिका

३० जूनपर्यंत सवलत
वर्णन / टक्के
आगाऊ करभरणा / १०
ऑनलाइन भरणा / ५
स्वतः नोंदणी / ५
एकूण सवलत / २०

महापालिकेचे उत्पन्न (कोटी रुपयांत)
वर्षे / मागणी / उत्पन्न
२०१९-२० / १११८ / ४८६
२०२०-२१ / १३३६ / ५५७
२०२१-२२ / १३२९ / ६०६
२०२२-२३ / १४३२ / ७७
(टीप ः २०२२-२३ मधील वसुली एक एप्रिल ते सहा मे पर्यंत अर्थात अवघ्या ३६ दिवसांतील आहे.)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60880 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top