गुन्हा दाखल करण्याची धमकी; माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हा दाखल करण्याची धमकी;
माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा
गुन्हा दाखल करण्याची धमकी; माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

गुन्हा दाखल करण्याची धमकी; माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : विरोधात निकाल दिल्याने मंडल अधिकारी महिलेला दमदाटी करीत त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हा प्रकार भोसरी येथील लांडेवाडीतील मंडल अधिकारी कार्यालयात घडला. या प्रकरणी माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिकारी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी नगरसेवक काळूराम मारुती पवार, अशोक किसन बहिरवाडे, सागर बहिरवाडे (दोघेही रा. गवळीवाडा, चिंचवड स्टेशन) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी (ता.५) दुपारी बाराच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी यांच्या कार्यालयात आले. आरोपींनी संगनमत करून ''तू आमच्या विरोधात निकाल का दिला. तू इथे नोकरी कशी करते तेच मी बघतो'', असे म्हणत फिर्यादीकडील कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चिखली येथे बैलगाडा शर्यती असल्याने बैलगाडा शर्यतीच्या घाटाचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी जात असताना आरोपींनी त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेत रस्ता अडवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच काळूराम पवार यांनी फिर्यादी यांना ‘तुझ्यावर अ‍ॅट्रॉसिटीची केस टाकून तुला कारागृहात टाकतो’, अशी धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60886 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top