देहूरोडमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूरोडमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
देहूरोडमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

देहूरोडमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

sakal_logo
By

देहूरोड, ता. ६ ः देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील गांधीनगर, आंबेडकरनगर आणि पंडितचाळ या भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दिवसाला केवळ दहा मिनिटे होत आहे. कँटोन्मेंट बोर्डाने नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष परशुराम दोडमणी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

गांधीनगर, पंडितचाळ आणि आंबेडकरनगर येथे झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीलगतच बोर्डाची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे, तरीही या भागात दिवसाला दहा ते पंधरा मिनिटे पुरवठा होतो. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत. या ठिकाणी पूर्वी सकाळी सात ते सकाळी दहा, असा पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी दोडमणी यांनी बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60888 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top