Sun, May 29, 2022

नशेचे औषध देऊन
तरुणीवर अत्याचार
नशेचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार
Published on : 6 May 2022, 1:21 am
पिंपरी, ता. ६ : मद्यातून नशेचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार केला. त्याचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत दोन ते तीन लाख रुपये घेतले. हा प्रकार बालेवाडी व चिंचवड येथे घडला. पंकज अनिल खंडागळे (वय २८, रा. बेलठीकानगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी तरुणीला मैत्रीच्या संबंधातून बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिला मद्यातून नशेचे औषध पाजून बेशुद्ध करीत अत्याचार केला. आरोपीने त्याचे व्हिडीओ तयार केले. ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडे पैशांची मागणी केली. तसेच तरुणीला आरोपीने चिंचवड येथील एका लॉजवर नेवून वेळोवेळी अत्याचार केला. आरोपीने तरूणीकडून दोन ते तीन लाख रुपये घेतले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60893 Txt Pc Today
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..