
महिलेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी
पिंपरी, ता. ६ : पाण्यात खेळताना लहान मुलाने पाणी उडविल्याने एक महिलेने त्याच्याकडे विचारणा करून त्याला घरी जा म्हणाली. यावरून महिलेला मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी रेखा सूरज चंदनशिवे (रा. रमाबाई नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनी श्रीकांत सोनवणे (वय २४), श्रुती श्रीकांत सोनवणे (वय २२), संचिता श्रीकांत सोनवणे (वय १९), श्रीकांत ईश्वर सोनवणे (वय ४५), तोलन (वय ६०) व एक महिला (सर्व रा. रमाबाईनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल दाखल झाला आहे. बुधवारी (ता. ४) सकाळी दहाच्या सुमारास फिर्यादी या घरासमोर कपडे धूत असताना शेजारील गल्लीतील नऊ वर्षीय मुलगा नळाच्या पाण्यात खेळत होता. त्यावेळी मुलाने नळाचे पाणी उडविल्याने फिर्यादीने त्याच्याकडे विचारणा करून त्याला घरी जा म्हणाल्या. यावरून मुलाच्या कुटुंबातील आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व हाताने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60902 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..