
दिव्यांग ओळखपत्रांसाठी ३१ मे पर्यंत मुदत
पिंपरी, ता. ६ ः ‘‘शहरातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, त्यांना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र’ आणि ‘वैश्विक ओळखपत्र’ (युडीआयडी) दिले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका १० ते ३१ मेपर्यंत विशेष मोहीम राबविणार आहे. पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे ओळखपत्र वाटप केले जाणार आहे, अशी माहिती प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.
राज्य दिव्यांग आयुक्तालयाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींचे राहणीमान उंचविण्यासाठी त्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. महापालिकेने शहरातील दिव्यांगांच्या सर्वेक्षणासाठी स्वतंत्र लिंक तयार केली आहे. त्याची माहिती महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in (सर्वसाधारण माहिती सारथी दिव्यांग किरण) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दिव्यांग व्यक्तींनी सर्वेक्षण फॉर्म भरणे बंधनकारक आहे. ‘दिव्यांग प्रमाणपत्र’ व ‘युडीआयडी’ www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावरून प्राप्त करता येईल. दिव्यांगांसाठी महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे, असे नागरवस्ती विकास योजना विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60915 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..