जादा परताव्याच्या आमिषाने एकाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जादा परताव्याच्या आमिषाने एकाची फसवणूक
जादा परताव्याच्या आमिषाने एकाची फसवणूक

जादा परताव्याच्या आमिषाने एकाची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : गुंतविलेल्या रकमेवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाची फसवणूक केली. याप्रकरणी गोपाल व्यंकट राजू (रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय, हितेश यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना एसएमएस करून ट्रेडशॉटफ्स या नावाच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या फॉरेक्समध्ये पैसे गुंतवणूक करून मोठ्या रकमेचा परतावा मिळण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीचा विश्वास बसण्यासाठी इतर लोकांना फायदा झाल्याचे स्क्रिनशॉट फिर्यादीला पाठविले. फिर्यादीने त्यांच्या वेबसाइटला भेट दिली असता तेथेही लोकांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे फिर्यादीने त्यांचे केवायसी डॉक्युमेंट पाठवून ऑनलाइन खाते उघडले. त्याद्वारे फिर्यादीने त्यांच्याकडे पैसे गुंतविले. त्यावर परतावा मिळाल्याचे भासवून त्यांनी फिर्यादीस २१ लाख ६६ हजार रुपये भरण्यास भाग पाडून फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60923 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top