देहूगाव, दिघीमध्ये घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूगाव, दिघीमध्ये घरफोडी
देहूगाव, दिघीमध्ये घरफोडी

देहूगाव, दिघीमध्ये घरफोडी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : देहूगाव व दिघी येथे घडलेल्या घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

देहूगाव येथील घटनेप्रकरणी भूषण जयराम पाटील (रा. माळीनगर, देहूगाव) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पाटील यांची देहू बायपास रोडला कंपनी आहे. या कंपनीच्या कंपाउंडचा पत्रा कापून चोरटा आत शिरला. कंपनीतील माल, लॅपटॉप व मोबाईल, असा एकूण एक लाख सहा हजारांचा माल चोरला. तसेच, दिघीतील कृष्णानगर येथील घटनेप्रकरणी एका महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटा घरात शिरला. ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60943 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top