‘जस्ट फॉर हार्ट्स’तर्फे मधुमेहावर कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जस्ट फॉर हार्ट्स’तर्फे 
मधुमेहावर कार्यशाळा
‘जस्ट फॉर हार्ट्स’तर्फे मधुमेहावर कार्यशाळा

‘जस्ट फॉर हार्ट्स’तर्फे मधुमेहावर कार्यशाळा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : मधुमेह किंवा डायबेटिस हा आजार असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आहाराचे योग्य व्यवस्थापन आणि जीवनशैलीतील बदलामुळे मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. त्यावर आधारित डायबेटिस फ्रेंडली स्नॅक्स’ या ६ मे रोजी झालेल्या कार्यशाळेमध्ये ५० जणांनी सहभाग नोंदवला.
जस्ट फॉर हार्ट्सचे डॉ. तेजस लिमये यांनी मधुमेहींनी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी काय खावे, काय टाळावे. तसेच कोणकोणते दोन पदार्थ एकत्र खाल्ल्याने रक्तातील साखर वाढण्याचा वेग कमी होतो, याविषयी मार्गदर्शन केले. मधुमेहींना अनेक पथ्ये पाळावी लागतात, अशावेळी जेवणात काय घ्यावे, याचा विचार करावा लागतो. मधल्या वेळेत काय खावे, हा नेहमीचा प्रश्न असतो. त्यासाठी घरी, ऑफिसमध्ये, प्रवासात, किंवा रात्रपाळी करणाऱ्यांनी कोणकोणते पदार्थ खावेत. तसेच, रक्तातील साखर वाढण्याची भीती न बाळगता काय खाता येतील, यावर मार्गदर्शन व पाककृती डॉ. लिमये यांनी सांगितल्या. सहभागी सदस्यांना पाककृतींचे पुस्तक दिले. दरमहा होणाऱ्या मोफत कार्यशाळांची माहिती जस्ट फॉर हार्ट्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61045 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top