
लन्गापूर्वीच जोडीदारांनी रक्ततपासणी करून घ्यावी
पिंपरी, ता. ७ : थॅलसेमिया ही आनुवंशिक व्याधी आहे. या आजाराचे कमी स्वरूप असलेल्या दाम्पत्यातून जन्माला येणाऱ्या अपत्यात हा आजार गंभीर स्वरूपाचा असतो. हिमोग्लोबिनची निर्मिती थांबते. लोहाची कमतरता असते. खेळण्या-बागडण्याच्या वयातील मुलांना रक्तासाठी सतत वणवण करावे लागते. गेल्या सात वर्षात शहरात १५५८ मुले आढळली असून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहेत. लग्नापूर्वीच जोडीदारांनी रक्त तपासणी केल्यास निरोगी अपत्य जन्मास येईल, असा डॉक्टरांचा सल्ला असतो.
---
आजाराची लक्षणे
सततचे आजारपण, सर्दी-पडसे, अशक्तपणा आणि उदासीनता, वयानुसार शरीराची वाढ खुंटणे
अंग पिवळे-पांढरे होणे, दात जास्त बाहेर येणे, चेहरा विद्रूप होणे, श्वास घ्यायला त्रास होणे
अतिसंक्रमण होणे, वजन कमी होणे, हालचाली मंदावणे, चिडचिडेपणा वाढणे, हृदयावर सूज येणे
---
बचाव कसा करावा -
लग्नापूर्वी जोडीदाराची संपूर्ण रक्ताची तपासणी
गरोदरपणात तपासणी
हिमोग्लोबिन स्तर ११-१२ राखावे
वेळच्या वेळी औषधे घेणे आणि निदान पूर्ण करणे
दर महिन्याला रक्त भरावे
----
जन्म घेणाऱ्या बाळाच्या आई-वडिलांचा जीन्समध्ये किरकोळ थॅलसेमिया असेल तर, बाळालाही होवू शकतो. सहा महिन्यापासून याचे निदान समजण्यास मदत होते. औषधोपचार मिळाल्यावर त्यांचे जगण्याचे प्रमाण समजते. या आजारामध्ये जसे-जसे वय वाढते तसे-तसे रक्ताची गरज व औषधे जास्त भासतात. दवाखान्यात वेळेत बोलावून हिमोग्लोबिन १० च्या खाली गेल्यास त्यांना त्वरित ॲडमिट करून घ्यावे लागते. लगेच रक्त द्यावे लागते. सारखे रक्त भरूनही शरीरावर दुष्परिणाम होतात. गरोदरपणात वेळेत तपासण्या केल्यास गर्भपाताचा सल्ला आम्ही देतो. ही मुले वयाच्या २० वर्षाच्या पुढे जगत नाहीत.
- डॉ. दीपाली अंबिके, बालरोगतज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय
---
हा आजार मुलांमध्ये जन्मापासूनच असतो. जन्माच्या तीन महिन्यानंतर लक्षणे दिसून येतात. रक्त कमी होऊ लागते. त्यामुळे बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. हिमोग्लोबिनची कमतरता होते. वारंवार रक्त द्यावे लागत असल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोहतत्त्व जमा होतं. जे नंतर हृदयासाठी प्राणघातक ठरू शकते. हा खर्चिक औषधोपचार आहे. रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी शिबिरे होणे आवश्यक आहे. आजार पूर्ण बरा होवू शकत नाही
- डॉ. दत्तात्रेय सूर्यवंशी, मेडीसीन तज्ज्ञ
----
वर्ष रुग्ण संख्या
२०१६ ११३
२०१७ २९२
२०१८ ३६६
२०१९ ४३१
२०२० ११३
२०२१ १६७
२०२२ ७६
एकूण : १५५८
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61081 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..