सीईटी, जेईई, नीट प्रवेश परीक्षाबाबत मार्गदर्शन सहावी ते अकरावीचे विद्यार्थी, पालकांसाठी रविवारी चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीईटी, जेईई, नीट प्रवेश परीक्षाबाबत मार्गदर्शन 

सहावी ते अकरावीचे विद्यार्थी, पालकांसाठी रविवारी चर्चासत्र
सीईटी, जेईई, नीट प्रवेश परीक्षाबाबत मार्गदर्शन सहावी ते अकरावीचे विद्यार्थी, पालकांसाठी रविवारी चर्चासत्र

सीईटी, जेईई, नीट प्रवेश परीक्षाबाबत मार्गदर्शन सहावी ते अकरावीचे विद्यार्थी, पालकांसाठी रविवारी चर्चासत्र

sakal_logo
By

सकाळ विद्या लोगो

पिंपरी, ता. ७ ः ‘सकाळ विद्या’ व ‘एक्‍सिड’च्या (एक्‍सलंट एज्युकेशन) वतीने अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विज्ञान क्षेत्रातील करिअर, प्रवेश परीक्षांबाबत मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केले आहे. रविवारी (ता.१५) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे होणाऱ्या या चर्चासत्रात अभियांत्रिकी व मूलभूत विज्ञान शाखेत शिक्षण घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा आणि आयआयटीसाठी कशी करावी तयारी, या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

अभियांत्रिकीसाठी द्याव्या लागणाऱ्या राज्य पातळीवरील सीईटी आणि देश पातळीवरील जेईई व वैद्यकीयसाठी नीट परीक्षा आहेत. तसेच इयत्ता सहावी ते दहावीच्या एनएसओ, आयएमओ, होमीभाभा, एनटीएसइ या परीक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम यावर विद्यार्थ्यांना प्रा. आशिष दुबे (बीटेक, एमटेक आयआयटी, मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत. प्रा. दुबे यांना शिक्षण व करिअर समुपदेशन क्षेत्रातील २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.

या स्पर्धेच्या युगात सगळ्यांनाच आयआयटीसारखी स्पर्धा परीक्षा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची इच्छा असते. परंतु, योग्य वयात योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळत नसल्याने मुले गोंधळतात. त्यासाठी इयत्ता सहावीपासूनच मुले अभ्यासाची तयारी करू शकतात, हेच पालकांना माहीत नसल्यामुळे आयआयटी व वैद्यकीयची तयारी करण्यात अडचण येते. पण, आता सहावीपासून एनएसओ, आयएमओ, होमीभाभा, एनटीएसइ या परीक्षांच्या तयारीबरोबरच आयआयटी व वैद्यकीयासाठीच्या प्रवेश परीक्षांची तयारी करता येत आहे. त्यामुळे मुलांचा ‘बेस’ पक्का झाल्यावर प्रवेश परीक्षा ‘क्रॅक’ करणे सोपे होऊ शकते.

चर्चासत्रातून मिळणार सर्व प्रश्‍नांची उत्तरे

याशिवाय अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच सीईटी, जेईई, नीट आणि केव्हीपीवाय या प्रवेश परीक्षांची तयारी तसेच अभ्यासाचे नियोजन कसे करावे, सहावी-दहावीपासूनच तयारीला लागलो तर बारावीमध्ये अभ्यासाचा ताण कसा कमी होऊ शकतो, बारावीनंतर अभियांत्रिकी व मूलभूत विज्ञान शाखेतील करिअरचे विविध पर्याय आणि त्यातील शिक्षण घेण्यासाठी आयआयटी, एनआयटी, बीट्‌स, व्हीआयटी, आयआयएससी, आयसर, एनआयएससीआर या सारख्या देशभरातील नामांकित शिक्षण संस्था व त्यांच्या प्रवेशप्रक्रिया यांबाबत मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थी व पालकांच्या करिअर व प्रवेश परीक्षांतील बदलांविषयीच्या सर्व शंका व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील.

असा होणार कार्यक्रम

कधी- रविवार, ता. १५ मे २०२२
केव्हा - सकाळी १० वाजता
कोठे - प्रा. रामकृष्ण मोरे, प्रेक्षागृह- चिंचवड
प्रवेश - विनामूल्य
नाव नोंदणी आवश्‍यक व संपर्क - ९८८१९०७२५२

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61107 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top