
गुन्हे वृत्त
थेरगावमध्ये तिघांची फसवणूक;
दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ७ : कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने तिघांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार थेरगाव येथे घडला. अभिजित तानाजी आढाव (वय ४०, रा. भवानी पेठ, पुणे), सनी (रा. चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अंकुश गजानन पोलकम (रा. सुदर्शन कॉलनी, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींने फिर्यादीला पाच लाखांचे कर्ज काढून देण्याचे खोटे आश्वासन दिले. फिर्यादीसह त्यांच्या पत्नीला वाकड येथील एका शोरूममध्ये बोलावून घेतले. सिविल स्कोअर वाढवून देतो असे सांगून फिर्यादीच्या नावावर एचडीएफसी फायनान्सचे ४० हजारांचे कर्ज घेत मोबाईल खरेदी करून फिर्यादीची फसवणूक केली. वाकड पोलिस तपास करीत आहेत.
देहूत सव्वा दोन लाखांचा माल चोरीला
कंपनीच्या शेडचा पत्रा कापून आत शिरलेल्या चोरट्याने सव्वा दोन लाखांचा माल लंपास केला. ही घटना देहूगाव येथे घडली. याप्रकरणी रामकृष्णन पोन्नूचामी (रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांची देहूतील विठ्ठलवाडी येथे कंपनी आहे. या कंपनीच्या शेडचा पत्रा कापून चोरटा आत शिरला. येथील वेल्डिंग टॉर्च, वेल्डिंग केबल, गॅस कटिंग टॉर्च, रेग्युलेटर असा एकूण दोन लाख २३ हजार २०० रुपये किमतीचा माल चोरला. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
करन्सी स्वस्तात देण्याच्या आमिषाने फसवणूक
यु.एस.डी.टी. डॉलर ही व्हर्च्युअल करन्सी स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ताथवडे येथे घडला. शुभम हवा (रा. काटे वस्ती, पुनावळे, मूळ- लातूर), केशव देवकर अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रसाद नागेश शेट्टी (रा. संगम चौक, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने त्याच्याकडील मौल्यवान वस्तू दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याच्याकडील यु. एस. डी. टी. डॉलर ही व्हर्च्युअल करन्सी पाच रुपये दराने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीला ताथवडे येथे बोलावून घेतले. फिर्यादीकडून केशव देवकर याच्या मदतीने दहा लाख रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
रहाटणीत दीड लाखांचा माल चोरीला
ऑफिसचे कुलूप तोडून ऑफिसमध्ये शिरलेल्या चोरट्याने दीड लाखांचा माल चोरला. हा प्रकार रहाटणी येथे घडला. याप्रकरणी शैलेश मोहन म्हात्रे यांनी फिर्याद दिली आहे. ते रहाटणी येथील रिचमंड पार्क येथे स्टोअर कीपर म्हणून नोकरीला आहेत. दरम्यान, याठिकाणी असलेल्या पहिल्या मजल्यावरील ऑफिसचे कुलूप तोडून चोरटा आत शिरला. टेबलच्या ड्रॉव्हरमधील चावी घेऊन स्टोअर उघडून त्यातील एक लाख ४२ हजार ७७७ रुपये किमतीचा माल चोरला. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
चिखलीत बारावर्षीय मुलीचा विनयभंग
बारावर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार चिखली येथे घडला. नवनाथ विष्णू वायकर (वय २८, रा. बांदलवाडी, इंदापूर रोड,बारामती) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी घर एकटी असताना आरोपी तूप गरम करण्याच्या बहाण्याने घरात शिरला. मुलीशी अश्लील वर्तन करून विनयभंग केला. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61198 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..