
‘सीओडी’ कामगार विकास आघाडीचे वर्चस्व
देहूरोड, ता. ८ ः लष्कराच्या केंद्रीय आयुध भांडार (सीओडी) डेपोमध्ये झालेल्या वर्क्स कमिटी निवडणुकीत सीओडी कामगार विकास आघाडीचे दहा पैकी नऊ उमेदवार निवडून आले. तर संयुक्त विकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाला.
दोन वर्षांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत सीओडी वर्क्स युनियन आणि सीओडी बहुजन कामगार संघाने कामगार विकास आघाडी केली होती. दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विकास आघाडीचे नऊ उमेदवार विजयी झाले. तर संयुक्त विकास आघाडीचा एक उमेदवार निवडून आला.
सीओडी कामगार विकास आघाडीचे विजयी उमेदवारात निलेश भेगडे, संतोष शितकल, संजय डुमडे, प्रमोद मलगेकर, लक्ष्मण टिळेकर, संभाजी भसे, परशुराम एल. मुक्रोळ, विशाल रणदिवे, जॅाय. व्ही यांचा समावेश आहे. संयुक्त कामगार आघाडीचे निरंजन कारेकर हे एकमेव उमेदवार निवडणुकीत विजयी झाले.
या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ले.कर्नल बी. एस. सागी, कर्नल सी. उपाध्याय तसेच निवडणूक अधिकारी कमलेश मुंशी ,डी .एस. जाधव यांनी काम पाहिले.
देहूरोड : सीओडी डेपोतील वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत विजयी उमेदवार.
(डीयूएच8पी501113)
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61387 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..