जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ : मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला गेलेल्या अभियांत्रिकीच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आकुर्डी येथे घडली.
कृष्णा क्षीरसागर (वय १९, रा. बॉइज् होस्टेल, प्राधिकरण, निगडी, मूळ- नांदेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा हा निगडीतील सेक्टर २५ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होता. रविवारी (ता. ८) सकाळी साडेआठच्या सुमारास तो त्याच्या मित्रांसोबत आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी गेला होता. तेथे पोहत असताना पाण्यात बुडाला. त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहे.
--------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61469 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top