श्रमाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे ः पठाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रमाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे ः पठाण
श्रमाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे ः पठाण

श्रमाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे ः पठाण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः अमेरिकेसारख्या देशात पूर्ण ऑटोमायझेशन झाल्यामुळे तेथे श्रमाला महत्त्व आणि किंमतही जास्त आहे. भारतात श्रमाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन. पठाण यांनी केले.

चिंचवड येथील गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय गुणवंत कामगार स्नेहमेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय अधिकारी सतीश मोटे, विभागीय कामगार आयुक्त दत्तात्रेय गायकवाड उपस्थित होते.

थायसन कृप इंडस्ट्रीजचे माजी संचालक आर. एस. नागेशकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहायक आयुक्त समाधान भोसले, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी संतोष दळवी, किर्लोस्कर कमिन्स इंडिया एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष सुधीर सरोदे, वालचंदनगर शुगर्स वर्कर्स युनियनचे अध्यक्ष युवराज रणवरे, कामगारभूषण शैलजा करोडे, मंडळाचे उपाध्यक्ष राज अहिरराव यांनी सहभाग घेतला.

या प्रसंगी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने पिंपरी येथील हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळाला रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्काराने’ सन्मानित केले. टाटा मोटर्स व्यवस्थापनाला ‘कामगार पुरस्कर्ते व्यवस्थापन’ पुरस्काराने सन्मान केला. कामगार भूषण पुरस्कारार्थी राजेंद्र वाघ, २०१५, २०१७ आणि २०१९ च्या गुणवंत कामगारांना ‘श्रमगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आले, तसेच प्रातिनिधीक स्वरूपात जादूगार रामचंद्र चडचणकर आणि कामगार भूषण जयवंत भोसले यांनाही श्रमगौरव पुरस्काराने गौरविले. पंतप्रधान श्रम पुरस्कारप्राप्त सुनील नायकवाडी, सुभाष चव्हाण, वसंत भांदुर्गे, शांताराम भोर, बाजीराव सातपुते, राकेश देशमुख, कैलास माळी व हेमंत माथाडे यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन राजेश हजारे, श्रीकांत जोगदंड, संगीता जोगदंड, संजय गोळे, भरत शिंदे, गोरखनाथ वाघमारे, महादेव धर्मे, कल्पना भाईगडे यांनी केले.
प्रास्ताविक तानाजी एकोंडे यांनी केले. सूत्रसंचालन भरत बारी आणि रेणुका हजारे यांनी, तर महंमद शरिफ मुलाणी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61552 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top