
मिळकत कर उतारा ऑनलाईन मिळावा
पिंपरी, ता.९ ः महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेत मिळकत कर उतारा प्रत ऑनलाइन करण्याची मागणी केली आहे. यासाठी नागरीकांनी पहिल्या सभेपासून मागणी करत असल्याचे सांगितले. तर ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या या सभेत आय हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी नागरीकांनी केली.
‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील सभेत करसंकलन कार्यालयाकडून देण्यात येणारा मिळकत कर उतारा सध्या हस्तलिखित स्वरूपात मिळतो. तसेच तो पाच ते सहा दिवसांनी मिळत असल्याने नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. म्हणून त्याची प्रत ऑनलाइन करण्याची मागणी झाली. जन्म-मृत्यूचा दाखला ३ ते ४ दिवसांनी मिळतो. पुणे महापालिकेत अर्ज केल्यानंतर १५ मिनिटांत दाखले मिळतात. त्याच धर्तीवर महापालिकेने आधुनिक प्रणाली विकसित करावी, अशी मागणी नागरिक कुंदन कसबे यांनी केली. या विषयावर प्रशासनाकडून त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
‘क’ क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत प्रलंबित अजमेरा येथील आय हॉस्पिटल लवकर सुरू करणे, डब्ल्यु सेक्टर ते अमृतेश्वर कॉलनी पर्यंत जाणारा बंद रस्ता सुरू करावा. किंवा तो का बंद ठेवण्यात आला आहे, त्यात कोणत्या अडचणी आहेत, याविषयी स्थानिक नागरिक दत्तात्रेय भालेराव यांनी प्रश्न विचारला आहे. म्हाडा मोरवाडी परिसरात २ स्मार्ट शौचालय निर्माण करावे, म्हाडा फेडरेशनचे मैदान क्रीडांगण म्हणून महापालिकेने विकसित करावे, अशी मागणी भालेराव व बी. आर. माडगूळकर यांनी केली.
‘ब’क्षेत्रीय कार्यालयातील सभेत केशवनगर कमी दाबाने पाणी येण्याबाबत नागिकांना प्रशासनाला जाब विचारला. मोरया गोसावी स्टेडिअमचे लवकरात लवकर काम करावे. रस्ते, अंतर्गत रस्त्यांवरील झाडांची छाटणी करा आणि मुख्य रस्त्यावर व गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याची मागणी नागरीकांनी केली. पेव्हिंग ब्लॉक बसविणे, फुटपाथावरील अतिक्रमण कारवाई कधी करणार? याविषयी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला. तर याच सभेत संजय गायखे यांनी काळेवाडीत भाजी फळे हातगाडीधारकांवर कारवाई करता व त्यांच्या हातगाडी, भाजी, फळे जप्त करता, मग अनधिकृत बांधकामावर करावी, त्यांचे पण सिमेंट, स्टील, वाळू, विटा जप्त का करत नाहीत? या बाबतीत प्रशासनाला विचारणा करण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61701 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..