चिंचवडमध्ये दाम्पत्य व महिला वाहतूक पोलिसात वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमध्ये दाम्पत्य व महिला वाहतूक पोलिसात वाद
चिंचवडमध्ये दाम्पत्य व महिला वाहतूक पोलिसात वाद

चिंचवडमध्ये दाम्पत्य व महिला वाहतूक पोलिसात वाद

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ : चिंचवडगावात नो-पार्किंमधील वाहनांवरील कारवाई दरम्यान एक दाम्पत्य व महिला वाहतूक पोलिस यांच्यात वादावादी झाली. मुलगा तापाने फणफणत असतानाही माणुसकीचा विचार न करता पोलिसाने हुज्जत घातल्याचा आरोप महिलेने केला आहे.

शनिवारी (ता.७) सायंकाळी डॉ. सीमा शर्मा या पतीसह त्यांच्या नऊ वर्षीय मुलाला उपचारासाठी चिंचवडगावातील शहीद अशोक कामठे बसस्थानकाजवळील एका दवाखान्यात आले होते. त्यांची दुचाकी नो-पार्किंगमध्ये असल्याने महिला वाहतूक पोलिस कारवाईसाठी गेल्या. त्यावेळी वाद झाला. शर्मा म्हणाल्या, ‘‘नो पार्किंगचा दंड भरण्यासाठी गेलो असता पोलिसाला तुमची भाषा आम्हाला समजत नाही असे म्हटल्याने व केवळ दुचाकी वाहनांवरच कारवाई का? असे विचारल्याने संबंधित पोलिसाने आपल्यावर अरेरावी केली. पतीचा वाहन परवाना, गाडीची चावी, मोबाईल काढून घेतला, तुमच्या डोळ्याला दुखापत करू असेही त्या म्हणाल्या,’’असा आरोप शर्मा यांनी केला आहे. मुलगा तापाने फणफणत असल्याने दंड घ्या व आम्हाला जाऊ द्या, अशी विनंती करूनही त्यांनी गाडीची चावी न देता आम्हाला थांबून ठेवले. यामध्ये एक तास गेला. पोलिसांचे हे कृत्य अमानवीय असल्याचे शर्मा म्हणाल्या.
--
चारचाकी वाहनांवरील कारवाईसाठी आमच्याकडे मोठे वाहन उपलब्ध नसल्याने त्यावर नंतर कारवाई करणार होतो. मात्र, आमच्यावरच कारवाई का असे म्हणत संबंधित महिलेने मला अपशब्द व अपमानास्पद भाषा वापरली. बराच वेळ हुज्जत घालत कामात अडथळा निर्माण करून तेथे गोंधळ घातला. शूटिंग काढत असल्याने मोबाईल घेतला होता. इतर वाहनांवर कारवाई सुरु असल्याने काहीसा वेळ गेला. शर्मा त्यांच्यावरील कारवाई नियमानुसारच असून दंडाची पावतीही दिली आहे.
- एस. व्ही. वाघमारे , पोलिस नाईक, चिंचवड वाहतूक शाखा
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61744 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top