
मिळेना टॅंकर, भरेनात तरण तलाव
पिंपरी, ता. ९ ः कोरोनामुळे बंद केलेले तरण तलाव सुरू करण्यासाठी महापालिकेला काही मुहूर्त सापडेनासा झाला आहे. त्यात आता तर क्रीडा विभागाची मदार खासगी टॅंकरवर असल्याचे दिसून येत आहे. पण सद्यःस्थितीत शहरात पाणी टंचाईमुळे टॅंकर मिळत नसल्याने नऊ तलाव अद्याप कोरडेच पडले आहेत. परिणामी ‘मिळेनात टॅंकर, भरेनात तरण तलाव’ अशी स्थिती सर्वत्र पाहायला मिळत आहे.
अनेक लोक सध्या पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून आहेत. टंचाईमुळे लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, अशा स्थितीत क्रीडा विभागाने तलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी आता ते तलाव भरण्यासाठी प्रत्येकी १० हजार लिटरचा एक टँकर मागवून तो ओतला जातो. एकेका तलावाला सुमारे दीडशे टँकर लागतात. त्या तुलनेत टँकरचा पुरवठा होत नसल्याने एक तलाव भरण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागला असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. अशा पद्धतीमुळे केवळ चार तलाव भरले गेले आहेत.
ऐन उन्हाळ्यात बंद
शहराच्या विविध भागात १३ तलाव आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तलाव पुन्हा पुर्ववत सुरू होतील, अशी अपेक्षा नागरीकांना होती. पण त्यातील काही सुरू आहेत. तर काही पाण्याअभावी व निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने ऐन उन्हाळ्यात बंद आहेत. काहींची अद्याप दुरुस्तीच सुरू आहे. त्यामुळे सुरू असणाऱ्या तलावांवर झुंबड असते, तरीही प्रशासनाला जाग येईना, अशी खंत नागरिक शहाजी शिंदे यांची आहे.
तलावांवर झुंबड
आकुर्डी, पिंपळे गुरव, कासारवाडी आणि पिंपरी वाघेरे या जलतरण तलावांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. मात्र, एकच सुरक्षा रक्षक असल्याने त्याला गर्दी आवरणे कठीण जाते. पाच वाजता सुरू होणाऱ्या तलावात पोहण्यासाठी दुपारी तीनपासून नागरिकाच्या रांगा असतात. प्रशासनाने सर्व तलाव एकाच वेळी सुरू करणे आवश्यक असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले.
कोट
‘‘कोरोनामुळे तलाव पाण्याचा उपसा करून बंद ठेवले होते. आता ते भरण्यासाठी टँकरची गरज भासत आहे. त्यामुळे जसाजसा टँकर उपलब्ध होईल, तेवढ्या लवकर जलतरण तलाव सुरू होतील.’’
-सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त क्रीडा विभाग
इन्फोबॉक्स
जलतरण तलाव - क्षमता
-नेहरूनगर - २० लाख लिटर
-मोहननगर - १० लाख लिटर
-आकुर्डी - १० लाख लिटर
-केशवनगर चिंचवड -१० लाख लिटर
-सांगवी - १० लाख लिटर
-पिंपळे गुरव - १० लाख लिटर
-वडमुखवाडी - १० लाख लिटर
-संभाजीनगर - ८.५० लाख लिटर
- भोसरी - १३.५० लाख लिटर
- थेरगाव - ८.५० लाख लिटर
- यमुना नगर - ८.५० लाख लिटर
-कासारवाडी - १० लाख लिटर
-पिंपरी वाघेरे -१० लाख लिटर
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61760 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..